महेश बोकडे, लोकसत्ता 

नागपूर : हल्ली समाज माध्यमांवर स्वयंघोषित आरोग्य तज्ज्ञांची संख्या वाढली आहे. विविध आजार बरे करण्याचा नावावर कोणी बांगला पान, कुणी लसूण तर कुणी केळीच्या फळात कापूर घालून खाण्याचा सल्ला देतोय. यामुळे काहींची प्रकृती खालावल्याचे निरीक्षण आयुर्वेद तज्ज्ञांची संघटना असलेल्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)ने नोंदवले आहे. 

श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
aam aadmi party protest kolhapur marathi news
ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी

निमा संघटनेच्या अखत्यारित असलेल्या डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, एका चलचित्रात नागरिकांना सलग १५ दिवस ४ ते ५ बांगला पान खाल्ल्यास वाताचा आजार नियंत्रणात येतो असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात बांगला पान उष्ण असते. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या तोंडाला फोडे येऊ शकतात. शरीलाला नवीन व्याधी होऊ शकते. एक असाच रुग्ण निमाचे राज्य संघटक डॉ. मोहन येंडे यांच्याकडे आला.

एका चलचित्रात केळीमध्ये कापूर घालून मूळव्याध बरा होत असल्याचे सांगण्यात आले. हा कापूर भिमसेनी असावा असेही यात नमूद आहे. परंतु कापूर उष्ण असते. ते जास्त खाल्ल्यास फुफ्फुस, यकृतावर परिणाम होऊ शकतो. एका चलचित्रात लसूण जास्त खाल्ल्यास हृदयाचे ब्लॉकेज कमी होत असल्याचे सांगण्यात येते. परंतु लसूणही उष्ण आहे. ते जास्त मूूळव्याधसह इतर आजार संभवतात. त्यामुळे आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय उपाय करणे काहींना रुग्णालयात पोहचवू शकते, असे मत नागपुरातील बुटीबोरी येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक कॉलेजचे उपप्राचार्य व निमा संघटनेचे राज्य संघटक डॉ. मोहन येंडे यांनी व्यक्त केले.

आयुर्वेदात विरुद्ध गुणधर्म असलेल्या वस्तू एकत्र करून खायला सांगितले जात नाही. संबंधित व्यक्तीची प्रकृती, त्याचा त्रास, शरीराची क्षमता बघून औषधांचे प्रमाण निश्चित केले जाते. एखाद्याला मधुमेह असल्यास गोड घटक वगळून काढा दिला जातो. त्यामुळे समाज माध्यमावर बघून उपाय करणे चुकीचे असून त्याने नवीन आजार संभावतात.      – डॉ. मोहन येंडे, राज्य संघटक (निमा).