scorecardresearch

व्वा! चवदार, रुचकर, लज्जतदार; वर्ध्यातील मराठी साहित्य संमेलनातील भोजनामुळे साहित्यरसिक तृप्त

आयोजकांनी एक फेब्रुवारीपासून जेवण देणे सुरू केले. संमेलनाच्या उद्घाटन सत्रापासून सशुल्क भोजन व नाश्ता दिला जात आहे. हा बेत साहित्य रसिकांच्या चांगलाच पचनी पडला.

Marathi Sahitya Sammelan Wardha
वर्ध्यातील मराठी साहित्य संमेलनातील भोजनामुळे साहित्यरसिक तृप्त (image – loksatta team)

वर्धा : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील साहित्यविषयक उपक्रमाने रसिक कितपत तृप्त झाले, हे अद्याप पुढे आले नाही. मात्र, भोजनाचा आस्वाद रसिकांसाठी तृप्तीचे ढेकर व समाधानाचे हुंकार देणारे ठरत असल्याचे दिसून येत आहे.

आयोजकांनी एक फेब्रुवारीपासून जेवण देणे सुरू केले. संमेलनाच्या उद्घाटन सत्रापासून सशुल्क भोजन व नाश्ता दिला जात आहे. हा बेत साहित्य रसिकांच्या चांगलाच पचनी पडला. सुग्रास बेत व नीटशी व्यवस्था असल्याने कुठेही गोंधळ उडाला नाही. एका परिसंवादात वक्ते असलेले डॉ. पुरुषोत्तम माळोदे म्हणतात, यापूर्वी मी दहा संमेलनास हजर होतो, पण अशी व्यवस्था कुठेही नव्हती. त्या संमेलनात दैनंदिन शंभर ते दीडशे प्रतिनिधी जेवत होते. इथे तर सशुल्क व मोफत असे पाचशेवर प्रतिनिधी भूक शांत करीत असल्याचे दिसून येताहेत. फक्त भोजन मंडप जरा दूर झाल्याने खोळंबा होतो.

हेही वाचा – वीज कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती वेतनासाठी अडीच दशकांपासून लढा; पाच राज्यांत लागू, महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना प्रतीक्षाच

हेही वाचा – बुलढाणा : विदर्भात भाजपला उतरती कळा, जनतेचे ‘पन्नास खोके’ला प्रत्युत्तर; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

डी. वाय. पाटील संस्थेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनीही पूर्वीच्या व या संमेलनातील फरक सांगताना भोजनाचे उत्कृष्ट नियोजन इथे असल्याची पावती दिली. काही पोलीस कर्मचारी व कामगारांनाच फक्त मोफत जेवणाची सुविधा आहे. नियोजन उत्कृष्ट ठरण्याचे कारण पाच मंडप. अतिथी, समिती सदस्य, कर्मचारी, व्हीआयपी व पदाधिकारी यांची स्वतंत्र व्यवस्था आहे. उद्घाटन सत्रात गर्दी लोटली होती. निमंत्रित नसलेल्यांना कूपन घेऊन जेवण करण्याची सोय ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्या दिवशी पण गोंधळ उडाला नसल्याचे भोजन व्यवस्थापक श्याम भेंडे व मोहन मिसाळ यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 16:17 IST