नागपूर : महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम गुरुवारी सायंकाळी ७ वाजता पूर्ण होऊन चाचणीही यशस्वी झाली. त्यामुळे गुरुवारी रात्री दक्षिण नागपुरात भारनियमन झाले नाही. थोडीफार वीज खंडित झाली असली तरी भारनियमन बंद झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा >>> नागपूर: मुंबई पोलीस भरती रद्द होणार? काय आहे नेमके प्रकरण वाचा…

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या
RBI Monetary Policy Meeting 2024 Repo Rate Unchanged Marathi News
RBI MPC Meet : रेपो दरात कोणताही बदल नाही; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, कर्जदारांना दिलासा!

महावितरणकडून योग्य वीज व्यवस्थापन केल्यामुळे बुधवारी रात्री दक्षिण नागपुरातील ६ फिडरवरील ग्राहकांनाच रात्री अर्धा ते एक तास वीज कपातीचा सामना करावा लागला. परंतु गुरुवारी रात्री ट्रान्सफार्मर कार्यान्वित झाल्याने भारनियमन करण्याची गरज पडली नाही. २१ मे रोजी महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील २५ एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफार्मर ठप्प झाल्याने महावितरणच्या दक्षिण नागपुरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.

हेही वाचा >>> नागपूर: ३३ तोळे सोने चोरीचा असा झाला उलगडा

तेंव्हापासून रोज रात्री विजेची मागणी वाढल्यावर भारनियमन करावे लागत होते. त्यामुळे महावितरणच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष वाढत होता. कमीत-कमी त्रास व्हावा म्हणून नियोजन केल्याचा दावा महावितरणकडून केला जात होता. शेवटी नवीन ट्रान्सफार्मर चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाली.  त्यामुळे शुक्रवारपासून दक्षिण नागपुरात वीज पुरवठ्याची स्थिती सुधारली आहे. नवीन ट्रान्सफार्मर कार्यान्वित करताना बुधवारी रात्रभर महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे, अमित परांजपे, समीर टेकाडे, मुकेश चौधरी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.