वक्ता दशसहस्त्रेषु’च्या व्यासपीठावर शब्दांची आतषबाजी; विभागीय प्राथमिक  फेरीचा उत्साहात प्रारंभ

नागपूर : ‘कलाकार कितीही चमकला तरी त्याची चांदी होत नाही आणि चरख्याच्या शेजारी फोटो काढून कुणी गांधी होत नाही..’ अशी तडाखेबाज शेरोशायरी आणि जन्मदातीच सुरक्षित नाही, त्या देशाला, ‘मेरा भारत महान’ कसे म्हणावे?, अशा विचारांच्या आधारे तरुणाईने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. निमित्त होते ‘लोक सत्ता’तर्फे आयोजित ‘वक्ता दशसहस्त्रेषु’या स्पर्धेचे.

अमरावती मार्गावरील विनोबा भावे विचार कें द्रात आज सोमवारी साडेनऊच्या ठोक्याला विभागीय प्राथमिक  फे रीचा उत्साहात प्रारंभ झाला. प्राथमिक  फे रीच्या पहिल्या सत्रात अधिकोधिक  स्पर्धक  हे विदर्भाच्या विविध जिल्ह्यातून आले असल्याने त्यांचे पालक देखील सोबत होते. स्पर्धास्थळी प्रवेश क रताच कोहींच्या चेहऱ्यावर उत्साह तर कोही थोडे अवघडलेले होते. दहाच्या ठोक्याला स्पर्धा सुरू  झाली आणि एक -एक  स्पर्धक  व्यासपीठावर येऊ न विषयाची मांडणी क रू  लागला. पहिल्या सत्रातील बहुतेक  स्पर्धकोंनी व्यासपीठावरू न तुफोन फ टके बाजी के ली. संवादफे क , आवाजातील चढउतार, शेरोशायरी असे सारे कोही ‘लोक सत्ता’च्या या व्यासपीठावर सादर झाले. अडखळल्यानंतर स्पर्धकोंच्याच सहकोऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात दिलेल्या प्रोत्साहनातून समूह बांधणीचा प्रत्यय देखील आला. आपला सहकोरी किं वा आपला पाल्य क सा बोलतो, कोही चुकी झाल्या तर पुढच्या खेपेला त्या कशा टाळता येतील, यासाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून स्पर्धकोची चित्रफि तसुद्धा तयार के ली जात होती. समोरचा स्पर्धक  चांगला बोलतोय हे पाहून त्यापेक्षा वरचढ ठरण्यासाठी कोहींनी भ्रमणध्वनीचा आधार घेत मुद्दे नोंदवले तर कोहींनी कोगदावर लिहून आणलेला विषय आपण विसरत तर नाही ना, यासाठी सभागृहाच्या बाहेर बसून मुद्दे पाठ के ले.

पालकांनी सुटी घेतली

अमरावती येथील योगेश बोबडे, यवतमाळ येथील संजय चव्हाण हे त्यांच्या मुलीला स्पर्धेक रिता घेऊ न आले होते. सोमवार कामाचा दिवस असल्याने त्यांनी खास मुलीसाठी सुटी कोढली होती. लहानपणापासूनच मुलांमधील क लागुणांचा प्रत्यय येत होता. त्यामुळे त्यांना वाव देणे हे पालकांचे क र्तव्य होते, असे या पालकांनी सांगितले.

प्रतिक्रिया

श्रोत्यांसाठी उत्तम संधी

तीन वर्षांपासून ‘लोकसत्ता’च्या वक्तृत्व स्पर्धेला येतो. दरवर्षी विविध विषयांवर तरुणाई येथे व्यक्त होत असल्याने त्यांच्यापासून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेची आम्ही दरवर्षी आवर्जून वाट बघत असतो. या स्पर्धेत मुलांना व्यासपीठ मिळतेच. यासोबतच श्रोत्यांनाही अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते. त्यामुळे या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो, असे मत विनायक पांडे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ

हल्लीच्या पिढीचे वाचन कमी झाले आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच वैचारिक आणि सामाजिक विषयावर माहिती असणे काळाची गरज आहे. लोकसत्ताच्या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थी विषयाचे वाचन करतात. त्यात लोकसत्तामधील स्पर्धेचे विषय हे फारच अभ्यासपूर्ण आणि ज्वलंत असतात. विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ नक्कीच आदर्शवत आहे, अशी प्रतिक्रिया सेवासदन अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका निता देव यांनी व्यक्त केली.

परीक्षा असूनही स्पर्धेत 

अकरावी, बारावीमध्ये काही स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता. तेव्हापासून वक्तृत्वाचा छंद दडला. मात्र, माझ्या सरांनी प्रथम वर्षांला प्रवेश घेताच दरवर्षी लोकसत्ताच्या वक्तृत्व स्पर्धेत जायचे हे बजावून सांगितले होते. स्पर्धेचा दर्जा बघून सरांच्या सूचनेचे महत्त्व आज कळाले. त्यामुळे उद्या तोंडी परीक्षा असूनही स्पर्धेत सहभागी झाल्याचे, गुणाक्षी धनेगावकर हिने सांगितले.

स्पर्धेचे आज दुसरे सत्र

एकविसाव्या शतकातही महिलांना समानतेची वागणूक मिळत नाही. देशात आजही स्त्रियांपेक्षा गायीला जास्त सन्मान मिळतो, अशी खंत ‘निर्भया आणि नंतर..’ या विषयावर बोलताना वक्त्यांनी मांडली. तसेच त्यांनी महिलांना केवळ आई, ताई, पत्नी, सून अशा नात्यांमध्ये बांधून घेण्यापेक्षा माणूस म्हणून समजून घ्यायला हवे, अशी भूमिकाही मांडली. ‘जंगलाच्या शोधात वाघोबा!’ या विषयावर बोलताना सिमेंटच्या जंगलात माणुसकी हरवल्याने वाघोबाला जंगलाच्या शोधत फिरावे लागत असल्याची खंत एका स्पर्धकाने मांडली. काही वर्षांपूवी देशात वाघाच्या ८ ते १० प्रजाती आढळत होत्या. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे जंगल नष्ट होत असून आता देशात वाघाच्या केवळ ३ प्रजाती आढळतात, याकडे वक्त्यांनी लक्ष वेधले. देशात केवळ  क्रिकेट या खेळाला महत्त्व दिले जात असल्याने देशातून खेळ संस्कृती हद्दपार होत चालली आहे. क्रिकेट शिवाय इतर खेळातील खेळाडूंना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने ऑलिम्पिक खेळात देशाला फार कमी पदके मिळतात, असे मत काही वक्त्यांनी मांडले. ‘ज्यांचे त्यांचे गांधी सावरकर’ या विषयाला मात्र पहिल्या दिवशी मोजक्याच स्पर्धकोंनी हात घातला. त्यामुळे उद्या मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या सत्राक डे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण विदर्भातून प्रतिसाद

अमरावती मार्गावरील विनोबा भावे विचार कें द्रात सकोळी दहा वाजता प्राथमिक  फे रीच्या पहिल्या सत्राला दीपप्रज्वलनाने सुरु वात झाली. यावेळी लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे उपनिवासी संपादक देवेंद्र गावंडे, वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे तसेच परीक्षक  उपस्थित होते. पहिल्या सत्रात नागपूरसह अक ोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा या जिल्ह्यातून स्पर्धकोंनी हजेरी लावली. उद्या मंगळवारी सकोळी ९.३० वाजता दुसऱ्या सत्राला सुरु वात होणार आहे.

स्पर्धक म्हणतात..

व्यक्तिमत्त्व विकासाला संधी

‘लोकसत्ता’च्या वक्तृत्व स्पर्धेत मी पहिल्यांदाच सहभागी झाले. विदर्भातील तरुणाईला ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठामुळे आमच्यातील व्यक्तिमत्त्व विकासाला संधी मिळत असल्याची प्रतिक्रिया अमरावती येथील गायत्री चावरे हिने व्यक्त केली.

आत्मविश्वास वाढला

‘लोकसत्ता’च्या वक्तृत्व स्पर्धेची ख्याती मी ऐकली होती. त्यामुळे यंदा सहभागी होण्याचे धाडस केले. येथे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळत असून आत्मविश्वास वाढत असल्याचे अंकुर कानेकर या स्पर्धकाने सांगितले.

ज्ञानात भर पडली

‘लोकसत्ता’च्या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेतला. मी केवळ मला बोलायचे त्याच विषयाचा अभ्यास केला होता. मात्र, येथे इतरही चार विषयांवर वक्त्यांना ऐकायला मिळाल्याने ज्ञानात भर पडल्याचे युवराज राठोड याने सांगितले.

मराठी जिवंत ठेवण्याचे कार्य 

स्पर्धा खूप छान आहे. आज मराठी भाषा लोप पावत आहे, अशी ओरड होत असते. मात्र, ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचे खूप मोठे काम होत असल्याचे वैष्णवी धनघोरकर ही स्पर्धक म्हणाली.

‘लोकसत्ता’मुळे वाचनाची सवय लागली

‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेतील विषय हे फारच ज्वलंत असतात. यामुळे चौफेर विषयांवर वाचनाची आवड सवय लागते. या स्पर्धेचा आपला एक दर्जा असल्याने कायम वाचन करण्याची सवय लागली, असे मंदार जोशी हा स्पर्धक म्हणाला.

अभ्यासपूर्ण विषय

लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेमधे असणारे विषय हे अभ्यासपूर्ण असतात. त्यामुळे नवनवीन विषयांची माहिती होते. यामुळे तरुणाईला एक चांगली संधी मिळत आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे हे माझे तिसरे वर्ष असल्याचे भक्ती जोशी हिने सांगितले.

प्रायोजक..

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर अशा आठ केंद्रांवर होत आहे. पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’ असून या स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’ हे आहेत. नॉलेज पार्टनर चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च हे आहेत.