गोंदिया : सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदड येथे शुक्रवारी पतीने तर दोन दिवसापूर्वीच बुधवारी पत्नीने  रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या जोडप्याचा नुकताच जानेवारी महिन्यात प्रेम विवाह संपन्न झाला होता. मात्र, हा प्रेम विवाह औटघटकेचा ठरत अल्पशा कालावधीनंतर भंगला होता. यामुळे पत्नी डीकेश्वरी दिगंबर भुसारी (१९) रा. सौंदड ने बुधवारी (३१ मे) ला गोंदिया – चांदाफोर्ट रेल्वेसमोर आत्महत्या केली होती. त्या पाठोपाठ तिच्या पतीने सुध्दा रेल्वेपुढे उडी येत आत्महत्या केली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

डूग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर श्रावण भुसारी वय (२४) वर्ष रा.सौंदड ( सडक अर्जुनी) असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी सौ. डीकेस्वरी दिगंबर भुसारी वय (१९)  या महिलेने ३१ मे रोजी दुपारी  याच रेल्वे मार्गावर आत्महत्या केली होती. पत्नी नंतर आता पतीने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. सदर अपघाताची माहिती रेल्वे विभागाचे कर्मचारी यांनी डूग्गीपार पोलिसांना दिली. सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दिगंबर श्रावण भुसारी याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.  पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगंजुडे यांच्या मार्गदर्शनात घटनेचा तपास पोलीस हवालदार आनंद दामले, पोलिस नायक संजय चकोले, पोलिस शिपाई महेश धूर्वे करीत आहेत.

Thane Housing Court
ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा, प्रलंबित १२० पैकी ११० तक्रारींवर निर्णय
wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce
पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट
Driver dies along with sibling after hitting tracks on negligently parked trailer solhapur
निष्काळजीपणे थांबलेल्या ट्रेलरवर ट्रॅक्स आदळून भाऊ-बहिणीसह चालकाचा मृत्यू
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी