एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर प्रेमी युगुलाने ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. महागडे कपडे, हॉटेल आणि महागडे सौंदर्य प्रसाधनांचा खर्च भागविण्यासाठी वाहन चोरीचा सपाटा सुरु केला. प्रेयसी दिवसाने वस्तीत टेहळणी करायची तर रात्रीला तिचा प्रियकर वाहन चोरी करायचा, असा प्रकार अनेक दिवस सुरु होता. शेवटी हे प्रेमी युगुल जरीपटका पोलिसांच्या हाती लागले. भिकाऱ्याच्या वेषात वेगवेगळ्या परिसरांमध्ये फिरून वाहन चोरी करीत असल्याची कबुली प्रेमीयुगुलाने दिली. ऋषी उर्फ लकी मधू शाहू (२८) रा. हुडको कॉलनी आणि पायल किशोर बुनकर उर्फ राजपूत (२७) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा >>>अकोला: २६ वर्षांत २११७ हृदयरुग्णांना नवसंजीवनी; ‘लॉयन्स मिडटाऊन’चा पुढाकार

how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल

ऋषी आणि त्याचा भाऊ गोल्डी चर्चित वाहन चोर आहेत. पायल घटस्फोटीत असून लकीशी तिचे प्रेम संबंध आहेत. दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये राहतात. २१ फेब्रुवारीला रात्री तमन्ना थापर (३२) रा. ज्योती सोसायटी, कडबी चौक यांनी त्यांचे वाहन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवले होते. मध्यरात्रीनंतर ऋषी आणि पायलने मिळून त्यांचे वाहन चोरी केले. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासले. ऋषी आणि पायल भिकाऱ्याच्या वेषात परिसरात फिरताना दिसले. ऋषी सराईत असल्याने पोलिसांनी त्याला ओळखले. त्याला अटक केली असता पायलची माहिती मिळाली. पोलिसांनी तिलाही अटक केली. चौकशीत आरोपींनी सीताबर्डी आणि जरीपटका ठाण्यांतर्गत आणखी दोन वाहन चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी तिन्ही वाहन जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रवण दत्त आणि सहायक आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष बाकल, निरीक्षक गोरख कुंभार, बजरंग खोमणे, मुकेश, आनंद, पंकज आणि गणेश यांनी केली. काही दिवसांपूर्वीच पाचपावली पोलिसांनी ऋषीचा भाऊ गोल्डी याला वाहन चोरीत अटक केली होती, हे विशेष.