scorecardresearch

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, काही ठिकाणी पावसाची शक्यता, देशातील हवामानात बदल, तापमानात घट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशातील हवामानात बदल झाला आहे.

rain india
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, काही ठिकाणी पावसाची शक्यता, देशातील हवामानात बदल, तापमानात घट (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशातील हवामानात बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरापासून आग्नेय द्वीपकल्पीय भारतापर्यंत तीव्र ईशान्येकडील वारे खालच्या उष्णकटिबंधीय पातळीवर वाहत आहेत. यामुळे बर्‍याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

२० ते २३ नोव्हेंबरदरम्यान तमिळनाडू आणि केरळमध्ये पावसाचा अंदाज आहे. २१ ला आंध्रप्रदेश किनारपट्टी तसेच २२ आणि २३ नोव्हेंबरदरम्यान कर्नाटकमध्ये पावसाची शक्यता आहे. २२ आणि २३ नोव्हेंबरला केरळ आणि माहेमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी दाट धुक्याची चादरही पाहायला मिळणार आहे. २० नोव्हेंबरला सकाळी पूर्व आणि दक्षिण आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. देशाच्या उर्वरित भागांत हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही.

Sikkim-flash-floods
सिक्कीममध्ये हिमनदी तलाव फुटून १४ मृत्यू, १०२ लोक बेपत्ता; तलाव कसे फुटतात?
mumbai ganpati visarjan 2023, what to do if fish bite, remedy after get bitten by fish
Mumbai Ganpati Visarjan 2023 Live : विसर्जनावेळी समुद्र किनाऱ्यावर मत्स्यदंश झाल्यास काय कराल…
Water in Kalmana
नागपूर : कळमना, वाठोडा परिसरात पाणीच पाणी, नंदनवन झोपडपट्टी पाण्यात
rainfall Maharashtra
राज्यात पावसाचा जोर वाढणार, १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान अंदाज

हेही वाचा – फडणवीस म्हणतात, “मी हेल्मेट विरोधात आंदोलन केले, वाटले नव्हते…”

राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढत आहे. मध्य महाराष्ट्रासह राज्यात इतर भागांत गारवा वाढला आहे. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील तापमनात घट झाली आहे. मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टीसह गोव्यात गारठा वाढला आहे. छत्तीसगड, तेलंगणा, रायलसीमा, किनारपट्टी आंध्रप्रदेश आणि यानाम आणि अरुणाचल प्रदेशात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे.

हेही वाचा – इगतपुरी ते बडनेरादरम्‍यान १० रेल्वे धावताहेत १३० च्‍या वेगात!

झारखंड, आसाम आणि मेघालयमध्ये अनेक ठिकाणी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकमध्ये काही ठिकाणी तसेच जम्मू काश्मीर, लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, कोकण आणि गोवा, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि उप-हिमालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम तापमान सामान्यपेक्षा कमी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Low pressure area in bay of bengal chance of rain at some places change in weather in india rgc 76 ssb

First published on: 20-11-2023 at 09:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×