scorecardresearch

Premium

३० सप्टेंबरपर्यंत अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा

अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा ३० सप्टेंबरपर्यंत तयार होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Low pressure zone Andaman Sea
३० सप्टेंबरपर्यंत अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा ३० सप्टेंबरपर्यंत तयार होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत कमी दाबाचा पट्टा मालदा ते मणिपूरपर्यंत पाहायला मिळत आहे. तसेच मध्य महाराष्ट्र ते झारखंडपर्यंत कमी दाबाच पट्टा सक्रीय आहे.

महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार असल्यामुळे हवामान खात्याने आज विदर्भ आणि कोकण भागात मेघगर्जनासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचप्रकारे मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, यामुळे हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. भारतातून मॉन्सून माघारी जात असताना महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

38 hour mega block on Harbour route for dedicated freight corridor work
Central Railway : ३८ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, ‘या’ मार्गावर धावणार नाही एकही लोकल; आत्ताच जाणून घ्या!
mumbai ganpati visarjan 2023, what to do if fish bite, remedy after get bitten by fish
Mumbai Ganpati Visarjan 2023 Live : विसर्जनावेळी समुद्र किनाऱ्यावर मत्स्यदंश झाल्यास काय कराल…
rainfall in Maharashtra
पश्चिम बंगाल, ओडिशाजवळ कमी दाबाचा पट्टा, राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
block 2 october Dedicated freight corridor panvel station CSMT Panvel local timatable changed mumbai
ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल; सीएसएमटी – पनवेल शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता

हेही वाचा – नागपूरवर आता संसर्गजन्य आजारांचे सावट! ‘या’ रोग आजाराचा सर्वाधिक धोका

हेही वाचा – “…तर मध्य, पूर्व नागपूर पुरात बुडाले असते”, असा दावा का केला जातो?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ आदी ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Low pressure zone in andaman sea till september 30 rgc 76 ssb

First published on: 25-09-2023 at 11:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×