अकोला : मध्य रेल्वे उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि संतरागाछी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
एप्रिल ते जुलै महिन्यादरम्यान सुविधा
लोकमान्य टिळक टर्मिनस- संतरागाछी – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ सेवा होतील. गाडी क्रमांक ०१००१ ही साप्ताहिक विशेष गाडी २१ एप्रिल ते १४ जुलै या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दर मंगळवारी २०.१५ वाजता सुटेल आणि संतरागाछी येथे तिसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण १३ फेऱ्या होतील. ट्रेन क्रमांक ०१००२ ही साप्ताहिक विशेष गाडी २३ एप्रिल ते १६ जुलै या कालावधीत, संतरागाछी येथून दर गुरुवारी १५.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या देखील १३ फेऱ्या होणार आहेत.
‘या’ स्थानकांवर गाड्या थांबणार
ही विशेष गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. दोन वातानुकूलित द्वितीय, १० वातानुकूलित तृतीय, चार शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि दोन जनरेटर डब्बे अशी गाडीची संरचना राहील.
तिकीट तपासणीतून १४.९५ कोटींचा महसूल
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तिकीट तपासणी महसूलामध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. रेल्वे गाड्या व स्थानकांवर राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमांमधून विभागाने एकूण १४.९५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. ही रक्कम मुख्यालयाने दिलेल्या १४.८० कोटीच्या उद्दिष्टापेक्षा अधिक आहे. २८ मार्च रोजीच हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नोंदवलेल्या १२.५९ कोटी या मागील सर्वोत्तम महसुलापेक्षाही यंदा अधिक महसूल प्राप्त करण्यात आला.
एकाच दिवसांत १०.९० लाख, ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक वसुली
एका दिवसातील सर्वाधिक तिकीट तपासणी महसूल १०.९० लाख रुपये १७ ऑक्टोबरला याच वर्षी प्राप्त झाला. महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी १.५५ कोटी रुपयांची वसुली ऑक्टोबर महिन्यात झाली. ही यशस्वी कामगिरी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाली असून, अनियमित प्रवास, विनातिकीट प्रवास आदींवर प्रभावी नियंत्रण ठेवून रेल्वे महसुलात वाढ झाली
