महाज्योतीचे विभागीय कार्यालय आता पुण्यातही!

बार्टी आणि सारथीप्रमाणे महाज्योतीचे मुख्य कार्यालयही आधी पुण्यातच होते.

नागपूर : महाज्योतीचे विभागीय कार्यालय पुणे येथे सुरू करण्याची मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. त्याला  महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महाज्योतीचे विभागीय कार्यालय आता पुण्यातही होणार आहे.

बार्टी आणि सारथीप्रमाणे महाज्योतीचे मुख्य कार्यालयही आधी पुण्यातच होते. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे ते  नागपूरला आणण्यात आले. नंतर महाज्योतीची विभागीय कार्यालये नाशिक, औरंगाबाद येथे सुरू करण्यात आली. पण, पुण्यात कार्यालय नव्हते. म्हणून समता परिषदेने  वडेट्टीवार यांच्याकडे तशी मागणी केली होती. समता परिषदेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष मनोज गणोरकर यांच्या नेतृत्वात नागपूर महाज्योतीच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. यानंतर पुणे येथे महाज्योतीचे विभागीय कार्यालय २८ नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mahajyoti divisional office is now also in pune akp