बुलढाणा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्धल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे चौफेर टीकेचे धनी ठरलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार आता ‘बॅकफूट’वर गेले आहेत. सत्तार यांनी आजचा त्यांचा सिंदखेडराजाचा नियोजित दौराच रद्द केला. यामुळे कृषिमंत्री सत्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य संघर्ष टळल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा >>> नागपूर : हिवाळी अधिवेशनाकरिता तात्पुरत्या स्वरुपातील भरतीसाठी तरुणांना आवाहन; २४ नोव्हेंबर अर्जाची अखेरची तारीख

supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…
Vijay Vadettiwars challenge to Dharmaraobaba Atram
“भाजपसोबतच्या बैठकीचे पुरावे दिल्यास राजकारण सोडणार, अन्यथा तुम्ही सोडा,” विजय वडेट्टीवार यांचे धर्मरावबाबा आत्राम यांना आव्हान
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग

कृषिमंत्री सत्तार यांनी खा. सुळे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याने राज्यात राजकीय वादळ उठले. आजही राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातही याचे हिंसक पडसाद उमटले. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सत्तार यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. बुलढाणा तालुका राष्ट्रवादीने तर जोपर्यंत माफी नाही तोपर्यंत जिल्हा बंदीचा इशारा दिला. अशातच, ना. सत्तार यांचा ८ तारखेचा जिल्हा दौरा जाहीर झाला.  तो केवळ सिंदखेडराजा तालुक्यापुरता मर्यादित होता. मंगळवारी सकाळी १० वाजता मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थळाचे ते दर्शन घेणार होते. राजमातेच्या दर्शनानंतर ना. सत्तार चांगेफळ येथे आयोजित  भागवत सप्ताहाला हजेरी लावून  सिल्लोडकडे कूच करणार होते. मात्र, आजही शांत न झालेल्या राजकीय वादळामुळे त्यांनी हा दौराच रद्द केला. यामुळे ना. सत्तार आणि राष्ट्रवादीतील  संभाव्य राजकीय संघर्ष टळला.