अकोला : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा जोरदार धडाडत असून नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. पश्चिम विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता अकोल्यात होणार आहे.

विधानसभा निवडणुकीतील विदर्भातील नरेंद्र मोदी यांची पहिलीच सभा अकोल्यात होत असून त्यात ते काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय लढतीचे चित्र स्पष्ट झाले. आता पुढील १० दिवस प्रचार मोहिमेला चांगलाच वेग येणार आहे. राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. विविध मतदारसंघात मोठ्या नेत्यांच्या सभांचे नियोजन केले जात आहे. पश्चिम विदर्भातील अकोला व वाशीम जिल्ह्यात पहिल्याच टप्प्यात दिग्गज नेते प्रचारासाठी डेरेदाखल होत आहेत.

Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Chandrapur assembly Constituency congress candidate Praveen Padvekar
काँग्रेसने तिकीट दिले आणि वाऱ्यावर सोडले…आता दलित उमेदवार एकटाच……
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
entry to Narendra Modis meeting venue will be denied if objectionable items are brought
…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत प्रवेशच मिळणार नाही!
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

हे ही वाचा… वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

सभेच्या वेळेत बदल

पश्चिम विदर्भाच्या पाच जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ९ नोव्हेंबरला सकाळी ११ अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नियोजित आहे. पूर्वी ही सभा दुपारी १२ वाजता होणार होती. मात्र, वाढते उन्ह लक्षात घेता आता ही सभा सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी महायुतीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह पाचही जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कृषी विद्यापीठ परिसरात भव्य मंडप उभारला जात आहे. सभेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या सभेसाठी पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांमधून लाखो नागरिक येणार असल्याचा दावा भाजपच्यावतीने करण्यात आला.

हे ही वाचा… फडणवीसांच्या मतदारसंघातील उमेदवार म्हणतो, “मी बेरोजगार, मला मत द्या…”

मोदी चौथ्यांदा अकोल्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोल्यात चौथ्यांदा येत आहेत. संघटनात्मक आणि सामाजिक कार्यासाठी एकदा नरेंद्र मोदींची मोठी सभा झाली. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची प्रचार सभा झाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील त्यांची अकोल्यात कृषी विद्यापीठाच्या मैदानातच सभा झाली होती. त्यानंतर आता २०२४ मध्ये देखील त्याच ठिकाणी सभा घेऊन नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विकास कार्यासह ते विरोधकांवर तोफ डागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader