नागपूर : सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती आदी मुद्दय़ांवरून  सरकारला घेरण्याची विरोधकांनी केलेली व्यूहरचना आणि त्यांना सडेतोड उत्तर देण्याची सरकारची तयारी यामुळे राज्य विधिमंडळाचे आज, सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. या अधिवेशनात महत्त्वाच्या प्रश्नांवरून विशेषत: राष्ट्रपुरुषांच्या अवमानावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. 

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या. सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घातला. या अधिवेशनात विरोधकांची एकजूट कायम दिसेल. सरकारचे अपयश लोकांसमोर उघडे पाडू तसेच महत्त्वाच्या  प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. तर, ‘लग्न एकाशी आणि संसार दुसऱ्याशी’ करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती विचारात न घेता मनमानीपणे कारभार ‘आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया’ असा कारभार सुरू होता. आम्हाला मात्र या राज्याचा ‘लवासा’ करायचा नाही.

demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न
Nitin Gadkaris development speed is limited in his second term as MP compared to the first five years
पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा खासदारकी भूषविताना गडकरींच्या विकास गतीला मर्यादा
arvind kejriwal arrest news india bloc stands united behind arvind kejriwal
विरोधकांची निवडणूक आयोगाकडे धाव; केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप, निवडणुकीदरम्यान तपास संस्थांचे प्रमुख बदलण्याची मागणी
sharad pawar arvind kejriwal
“केजरीवालांची अटक भाजपासाठी बुमरँग ठरेल”, २०१५, २०२० च्या निवडणुकींचा दाखला देत शरद पवारांचं वक्तव्य

म्हणूनच तत्कालीन सरकारच्या चुकीच्या कामांना स्थगिती दिली असून विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर सभागृहात चर्चा करण्याची सरकारची तयारी असून जशास तसे उत्तर देण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. सीमाप्रश्नावरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असली तरी हा राज्याच्या अस्मितेचा विषय असून त्याबाबत विधिमंडळात ठराव मांडण्यात येणार आहे.

तसेच सीमाप्रश्नावरून विरोधी पक्षातील काही नेते बैठका घेऊन वातावरण बिघडवत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केला. 

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज महाविकास आघाडीची बैठक

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. यानिमित्तानेविरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.   ही बैठक दुपारी ४ वाजता होणार आहे, असेही सांगितले. उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या कामकाजातही सहभागी होण्याची शक्यता आहे.