Maharashtra Assembly Winter Session 2022 Updates, Day 4 : नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात येत आहे. तर, शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. त्यामुळे आज दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024
Maharashtra News : सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन
uddhav thackeray amit shah latest news
Maharashtra News : “अमित शाहांना एवढंच सांगायचंय की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत…”, उद्धव ठाकरेंचा ‘त्या’ विधानावरून टोला!
VBA Candidate List
Maharashtra News : वसंत मोरेंचा वंचितमध्ये प्रवेश
ED, second Summons, Shiv Sena uddhav thackeray, Candidate, Amol Kirtikar, Questioning, Khichdi Distribution Case, lok sabha elections,
ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमोल कीर्तिकर यांना पुन्हा समन्स
Live Updates

Assembly Winter Session 2022 Updates, 22 December 2022 : अधिवेशनात आज कोणता मुद्दा गाजणार?

19:52 (IST) 22 Dec 2022
"महाराष्ट्रात BF 7 चा एकही करोना रुग्ण नाही, पण...", आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे नागरिकांना आवाहन

महाराष्ट्रात बीएफ ७ या प्रकाराचा कोणताही करोना रुग्ण आढळून आला नाही. चार रुग्ण भारतात आढळून आले आहेत, त्यात गुजरातमध्ये दोन आणि ओडीसात दोन, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाण्याचे काही कारण नाही. पण, कृपया मास्क वापरण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.

17:59 (IST) 22 Dec 2022
"मनिषा कायंदेंनी गुंडाच्या माध्यमातून माजी आमदाराला धमकवलं", राहुल शेवाळेंच्या पत्राचा हवाला देत दिलीप लांडेंची विधानसभेत माहिती

शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. विधानसभेत राहुल शेवाळेंचं पत्र वाचत शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे म्हणाले, "मनिषा कायंदे यांनी गुंडाच्या माध्यमातून धमकी दिली. तसेच, ब्लॅकमेलिंग करण्याचं काम केलं आहे. याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. पुन्हा तक्रार मागे घेण्यासाठी माजी आमदारांवर गुंडाच्या माध्यमातून दबाव आणला गेला. त्यामुळे राहुल शेवाळेंनी दिलेल्या पत्राची नोंद घेऊन चौकशी करण्यात यावी," असं दिलीप लांडेंनी सभागृहात सांगितलं.

14:38 (IST) 22 Dec 2022
“तुम्हाला सभागृह चालवायचं नाही का?”, अजित पवार विधानसभा अध्यक्षांवर संतापले

दिशा सालियन प्रकरणावर भास्कर जाधव यांना बोलून द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली. मात्र, अध्यक्षांनी त्यास नकार दिल्यानंतर अजित पवार संतापले. "तुम्हाला सभागृह चालवायचे नाही का?" असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

13:49 (IST) 22 Dec 2022
दिशा सालियन प्रकरण : "याप्रकरणाचे पुरावे....", देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत प्रतिक्रिया

दिशा सालियन प्रकरणाची मुंबई पोलिसांकडे केस आहे. ज्यांच्याकडे याप्रकरणाचे पुरावे असतील, त्यांनी द्यावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं आहे.

12:25 (IST) 22 Dec 2022
हिवाळी अधिवेशनावर सर्दी, खोकला, तापाचे सावट; ६५० पैकी निम्या जणांना लक्षण, ३ आमदारांचाही समावेश

नागपूर : जगातील काही देशात करोनाचे रुग्ण वाढत असतांनाच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप यापैकी एक वा अधिक लक्षणाचे रुग्ण वाढत आहे.

सविस्तर वाचा...

12:25 (IST) 22 Dec 2022
द्या खोके, भूखंड ओके| विरोधकांच्या घोषणांनी दणाणला विधिमंडळ परिसर

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सरकारला श्रीखंडाचे डबे दाखवून राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. या प्रसंगी द्या खोके, भूखंड ओकेसह इतर घोषणा, निदर्शने करून विरोधकांनी सर्वांचे लक्ष वेधले. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. बातमी वाचा सविस्तर

12:16 (IST) 22 Dec 2022
"आठ जूनच्या पार्टीत...", दिशा सालियन प्रकरणावरून नितेश राणेंकडून चौकशीची मागणी

कोणाच्या राजकीय दबावामुळे दिशी सालियन प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला. दिशा सालियन प्रकरणाची चौकशी सीबीआय नाहीतर मुंबई पोलिसांकडे आहे. तिच्या इमारतीचा सीसीटीव्ही फुटेज काय गायब करण्यात आला. ८ जूनच्या पार्टीत कोण कोण होतं, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

12:07 (IST) 22 Dec 2022
"मग सरकारचं लक्ष आहे, कुठं", अजित पवार संतापले

पहिल्या दिवशी पोलिसांना जेवण मिळालं नव्हतं. त्यावरून अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

11:34 (IST) 22 Dec 2022
फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधी पक्षाकडून सभात्याग; अजित पवार विधानसभा अध्यक्षांवर संतापले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिक प्रकरणावरून मुद्दा उपस्थित करत विधानसभेत बोलून देण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी त्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने सभात्याग केली आहे. आपल्या अधिकारांचा वापर करून, आपलीच बाजू योग्य कशी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, या सरकारला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहात, अशा शब्दांत अजित पवार संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

11:18 (IST) 22 Dec 2022
“‘AU’ प्रकरण काय आहे? यामुळे…’, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंची सभागृहात मागणी

गेले दोन दिवस दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत 'AU' प्रकरण गाजत आहे, ते काय आहे, आम्हाला कळलं पाहिजे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होतं आहे. हे प्रकरण महाराष्ट्रातलं आहे की दिल्लीतल नेमकं काय आहे, असे शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं

10:56 (IST) 22 Dec 2022
'AU' कोण है शिंदे गटाची घोषणाबाजी

'AU' कोण है म्हणत शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आहेत.

10:46 (IST) 22 Dec 2022
मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप; रोहित पवार

नागपूर: खासदार राहुल शेवाळे कधी संसदेत बोलत नाहीत. काल बोलून बोलून त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी मुंबईतील निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले. त्यात काहीच तथ्य नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. बातमी वाचा सविस्तर

विधनाभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची शिंदे सरकार विरोधात घोषणाबाजी