Maharashtra Assembly Winter Session 2022 Updates Today : नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाचा आज शेवटचा दिवस असून आजचा दिवस महाविकास आघाडीच्या आमदारांनी दाखल केलेल्या विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावामुळे गाजण्याची शक्यता आहे. मात्र विरोधी पक्षांमधील ३९ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या ठरावाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोणतीही कल्पना नसल्याचं खुद्द अजित पवार यांनीच सांगितलं आहे. तसेच या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी आवश्यक आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच गुरुवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. 

nagpur court marathi news, local self government body marathi news
स्वराज्य संस्थांच्या फलकांवर मराठीसह इतर भाषेचा वापर चुकीचा नाही, उच्च न्यायालयाचे एका प्रकरणात मत
Maharashtra News in Marathi
Maharashtra News : नाना पटोलेंच्या अपघातामागे संजय राऊतांचा हात? संजय शिरसाटांचा गंभीर आरोप, म्हणाले…
Neglect of Tribal and OBC Issues Voters Angers on congress and bjp in Gadchiroli Chimur
गडचिरोली : निवडणुकीतून आदिवासी, ओबीसींचे प्रश्नच बाद ? समाजात नाराजीचा सूर
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
Maharashtra News : गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

हिवाळी अधिवेशनातील घडामोडींसह राज्यभरातील विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सविस्तर बातम्या वाचा एकाच क्लिकर वर

Live Updates

Assembly Winter Session 2022 Live Updates, 30 December 2022 : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील प्रत्येक घडोमोडींच्या सविस्तर बातम्या वाचा एका क्लिकवर

17:30 (IST) 30 Dec 2022
अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावावरून महाविकास आघाडीतच मतभेद

नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने मोठं पाऊल उचलत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र विधिमंडळ सचिवांकडे दिलेल्या पत्रावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याने मविआ मधील मतभेद उघड झाले आहे.

सविस्तर वाचा...

17:29 (IST) 30 Dec 2022
विधानसभा अध्यक्षांच्याविरोधात आतापर्यंत ११ अविश्वास ठराव दाखल

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरुद्ध विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अविश्वास ठराव विधिमंडळ सचिवांकडे दाखल केला आहे. तो नियमानुसार आहे का? त्यावर चर्चा होणार का? असे नानाविध प्रश्न यानिमित्ताने विचारले जाणार आहेत. आतापर्यंत एकूण ११ वेळा विविध अध्यक्षांच्या विरुद्ध अशा प्रकारचे ठराव दाखल झालेले आहेत. नार्वेकर हे १२ वे अध्यक्ष ठरतील.

सविस्तर वाचा...

13:39 (IST) 30 Dec 2022
… तर तुमचे २०- २५ आमदार आमच्याकडे येतील, विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर बावनकुळे यांचा टोला

शिवसेनेत बंड होऊन राज्यात एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. यावेळी शिवसेनेचे बरेच आमदार सुरत मार्ग गुवाहाटी येथे गेले होते. त्याला काही महिने झाले असतांनाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुक्रवारच्या वक्तव्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहे.

सविस्तर वाचा...

12:31 (IST) 30 Dec 2022
बेईमानी करुन आलेल्या सरकारचा बदला निसर्गाने घेतला – बावनकुळे

समाजात बेईमानी होत असेल तर निसर्ग बदला घेतो. आताही तेच झाले आहे. बेईमानी करुन आलेल्या सरकारचा बदला निसर्गाने घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे निसर्गानेच आणले आहे, असे प्रतिपादन भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

सविस्तर वाचा...

11:57 (IST) 30 Dec 2022
‘..राज्यपाल झाले भाज्यपाल.., महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे’; विधानभवन परिसरात विरोधकांच्या घोषणा

राज्यपाल झाले भाज्यपाल.., महाराष्ट्राचे एकच म्हणणे द्या हाकलून हे बुजगावणे.. यासह अनेक घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवन परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी विधान भवनाच्या पायऱ्यांवर दोन बुजगावण्यांची हंडी फोडण्यात आली.

सविस्तर वाचा...

11:15 (IST) 30 Dec 2022
विधानसभा अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्कटदाबी – नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. पण हा अविश्वास प्रस्ताव वर्षाभराच्या आत आणता येत नाही असे सत्ताधाऱ्यांकडून दाखले दिले जात आहेत. सहा महिन्यांपूर्वी मांडलेला विश्वास प्रस्ताव होता. हा अविश्वास प्रस्ताव आहे आणिआम्ही नियमानुसारच आणला आहे. दोन आठवड्यात सभागृहाच्या कामकाजात विरोधकांना जनतेचे प्रश्न मांडू देण्यात आले नाहीत. आमची मुस्कटदाबी केली, असे पटोले म्हणाले. वाचा सविस्तर बातमी...

11:11 (IST) 30 Dec 2022
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडणाऱ्या मविआ आमदारांना अजित पवारांचा घरचा आहेर

नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाचा आज शेवटचा दिवस असून आजचा दिवस महाविकास आघाडीच्या आमदारांनी दाखल केलेल्या विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावामुळे गाजण्याची शक्यता आहे. मात्र विरोधी पक्षांमधील ३९ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या ठरावाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोणतीही कल्पना नसल्याचं खुद्द अजित पवार यांनीच सांगितलं आहे. तसेच या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी आवश्यक आहे, असंही अजित पवार म्हणाले. वाचा सविस्तर बातमी..

मात्र विरोधी पक्षांमधील ३९ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या ठरावाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोणतीही कल्पना नसल्याचं खुद्द अजित पवार यांनीच सांगितलं आहे.