Maharashtra Assembly Winter Session 2022 Updates, Day 3 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि नागपूर NIT कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणारवरून पहिल्या आणि दुसरा दिवस गाजल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Akola Lok Sabha Constituency, Witnesses Triangular Contest, Focus on Community Gatherings, food arrangement in campaign , lok sabha 2024, bjp, congress, vacnhit bahujan aghadi, community melava, lok sabha campaign,
अकोला : प्रचारात भेटीगाठी, जेवणावळीची धूम, उमेदवारांकडून…
jalgaon voter awareness marathi news, jalgaon voter id marathi news
तुमचे गाव, सोसायटीला सुवर्ण, रौप्य, कांस्य यांपैकी कोणता फलक हवा ? मतदान टक्केवारी वाढीसाठी प्रशासनाचा अनोखा उपक्रम
pressure group of doctors formed ahead of lok sabha elections to accept demand
डॉक्टरांचाही आता राजकीय दबाव गट
Public holidays in constituencies on voting day
मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी… कुठे आणि कधी असणार सुट्टी?
Live Updates

Assembly Winter Session 2022 Updates, 21 December 2022 : विधानसभेत आज विदर्भ-मराठवाड्यातील प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता

19:53 (IST) 21 Dec 2022
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाबाबत आठवडाभरात अहवाल सादर करा - मुख्यमंत्री

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुण्यातील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी नागपूर येथे आढावा बैठक घेतली. भिडेवाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच येत्या दोन महिन्यांत भूमिपूजन करण्याच्या कालमर्यादेत काम करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

18:48 (IST) 21 Dec 2022
करोनासंदर्भात शासनाला माहिती मिळण्यासाठी टास्क फोर्स गठीत होणार - फडणवीस

करोनासंदर्भात बदलत्या परिस्थितीचा सातत्याने अभ्यास करून, शासनाला वेळोवेळी माहिती देण्यासाठी समिती वा टास्कफोर्स गठित करण्यात येईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

18:44 (IST) 21 Dec 2022
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाप्रकरणी उच्चस्तरीय समिती - मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही

कोयना,धोम,कण्हेर,वीर अशा विविध धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात जमिनी वाटपासंदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

18:43 (IST) 21 Dec 2022
...म्हणून नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होतोय - राजेश टोपे

''बेमोसमी पावसामुळे तसेच सलग अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागा यांचे मोठे नुकसान झाल्याने नुकसानभरपाई देण्याचे सरकारने जाहीर केले. परंतु ही रक्कम राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यात जमा करण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास विलंब होत आहे.'' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

14:50 (IST) 21 Dec 2022
छगन भुजबळांनी मुंबईकरांची माफी मागावी, भाजपाची मागणी

विधानसभेत पुरवणी मागण्याबाबत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख सोन्याची अंडी देणारी कोंबडी असा केला. दरम्यान, यावरून सत्ताधारी भाजपाने आक्रमक होतं, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुंबईला कोंबडी म्हणून छगन भुजबळांनी मुंबईचा अपमान केला आहे. त्यांनी हे शब्द मागे घ्यावे आणि मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी केली. यावरून सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे बघायला मिळालं.

13:46 (IST) 21 Dec 2022
निर्भया पथकातील गाड्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ

निर्भया पथकातील गाड्या मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत असल्याची माहिती पुढे आली होती. हा मुद्दा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सभागृहात उपस्थित केला. यासंदर्भात उत्तर देताना या गाड्या मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनेच घेतला होता, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान, यावेळी गदारोळ झाल्याचे बघायला मिळालं.

13:27 (IST) 21 Dec 2022
China Covid Cases: “लॉकडाउन विसरु नका”, अजित पवारांनी आठवण करुन दिल्यानंतर फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले “तुम्ही…”

China Covid Explosion: चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणुतील नव्या उत्परिवर्तनाची माहिती मिळवण्यासाठी दैनंदिन करोना चाचण्यांत आढळलेल्या नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याची सूचना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मंगळवारी केली. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत चीमधील स्थितीचा उल्लेख करत देशात लॉकडाउन लागला होता हे विसरु नका याची आठवण करुन दिली आहे.

सविस्तर बातमी

13:13 (IST) 21 Dec 2022
Assembly Winter Session 2022 : १० हजार 'वेदर-स्टेशन' निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

अनेकदा एका गावात पाऊस पडतो आणि दुसऱ्या गावात पडत नाही. त्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीचे मोजमाप करताना अडचणी येतात. ही समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने १० हजार 'वेदर-स्टेशन' निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आहे. आमदार यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांच्या पीकविम्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

11:03 (IST) 21 Dec 2022
विधान भवनाबाहेर भाजपाचेही आंदोलन

एकीकडे नागपूर NIT च्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू असताना, विधान भवनाबाहेर भाजपाचेही सुषमा अंधारेंविरोधात आंदोलन सुरू आहे.

10:49 (IST) 21 Dec 2022
विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन

नागपूरमधील एनआयटीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. विधान भवनाच्या विरोधकांचे पायऱ्यांवर आदोलन सुरू असून 'खोके सरकारचा धिक्कार असो', 'भूखंडाचे श्रीखंड करणाच्या धिक्कार असो', अशी घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे.

10:34 (IST) 21 Dec 2022
विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात

विधानसभेचे कामकाज सुरू झाले असून प्रश्न-उत्तरांचा तास सुरू आहे. तर विधानपरिषेदचे कामकाजही थोड्यात वेळात सुरू होणार आहे.

10:33 (IST) 21 Dec 2022
“खोटारडेपणा अन् चेष्टा हाच त्यांचा खरा चेहरा”, नाना पटोलेंचं शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र; म्हणाले, “भाजपाने विदर्भासाठी…”

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि नागपूर NIT कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणारवरून पहिल्या आणि दुसरा दिवस गाजल्यानंतर आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तत्पूर्वी या मुद्द्यावरून टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. सविस्तर वाचा -

10:31 (IST) 21 Dec 2022
कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा - अजित पवार

महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करण्याबाबत विरोधी पक्ष पाठिंबा देणार आहे. आपल्याकडेही तसा ठराव केला जाईल. सातत्याने बोम्मई त्यांच्या भागातल्या नागरिकांना, कर्नाटकवासियांना बरं वाटण्यासाठी तशी वक्तव्य करत आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांन दिली आहे. सविस्तर वाचा

 

 

 

nagpur maharashtra assembly winter session

विधानसभेचे कामकाज सुरू झाले असून आज तिसऱ्या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.