चंद्रपूर : गोंडपिंपरी या ग्रामीण व मागास समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील विद्यार्थी, युवक, तरुग्णाई स्पर्धा परीक्षेत सातत्याने यश मिळवू लागली आहेत. नुकत्याच राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत अनिकेत भास्कर गायकवाड, श्रृतीका ब्रम्हानंद मल्लेलवार व रितीक भाउराव अवथरे या तीन विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे. गोंडपिंपरीत या तिन्ही विद्यार्थ्यांचे यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकसेवा आयोगाने घेतलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परिक्षेचा निकाल नुकताच लागला. यामध्ये तालुक्यातील विठठलवाडा या गावचा अनिकेतने सहा. अभियंता पद पटकावले. अनिकेत भास्कर गायकवाड हा विठठलवाडा येथील रहिवासी आहे. गोंडपिपरीच्या सान्ज्यो कान्व्हेंट मधून त्याने दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली. बी.जे.एम.कार्मेल एकाडमी मधून अनिकेतने बारावीचे शिक्षण घेतले.

तर नागपूर येथील प्रियदर्शीनी काॅलेज मधून त्याने बी.ई.सिव्हील मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नुकताच लोकसेवा परिक्षेचा निकाल लागला असून अनिकेत ने यात यश मिळवित बांधकाम विभागात सहा.अभियंता पदी बाजी मारली आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आईवडिलांना दिले आहे.

श्रृतीकाही राज्यसेवेत

विठठलवाडा येथील श्रृतीका ब्रम्हानंद मल्लेलवार या तरूणीने मागील वर्षी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. सध्या ती सहा.कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर रितीक हा कौशल्य विकास अधिकारी झाला आहे. विठठलवाडा येथील रितीक भाउराव अवथरे याने राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण करित कौशल्य विकास अधिकारी या पदावर लवकरच विराजमान होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडीलांचे अकाली निधन झाल्यानंतर रितीकने परिश्रम करित रितीकने हे यश मिळविले. घरची परिस्थीती हलाकीची असतांना आईने मोलमजुरी करून मुलाला शिक्षण देण्यास प्रोत्साहन दिले. अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करीत ग्रामीण भागातील या विद्यार्थांनी हे यश संपादन केले आहे.