scorecardresearch

“पराभवाच्या भीतीने मोदींनी विधेयक आणले काय ?”, पटोलेंचा सवाल

लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांचा पाठिंबा मिळावा यासाठी मोदी सरकारची धडपड सुरु आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.

nana patole on pm modi, congress leader nana patole on womens reservation bill
"पराभवाच्या भीतीने मोदींनी विधेयक आणले काय ?", पटोलेंचा सवाल (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : भाजपची आरक्षण व महिलांबाबतची भूमिका पाहता या विधेयकाची अंमलबाजणी तातडीने होईल, असे वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांचा पाठिंबा मिळावा यासाठी मोदी सरकारची धडपड सुरु आहे. केवळ आगामी निवडणुकीवर डोळा ठेवूनच हे विधेयक आणले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले. परंतु, भाजपची आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहता हे विधेयक आणखी एक निवडणूक ‘जुमला’च ठरेल असे दिसते. कायदा झाला तरी त्याची अंमलबजावणी २०२४ च्या निवडणुकीसाठी होणार नसून देशातील कोट्यवधी महिलांचा भ्रमनिरास सरकारने केला आहे, असा आरोप पटोले यांनी केला. ते नागपुरात बोलत होते.

couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

हेही वाचा : नागपूर : मेट्रो स्थानकांच्या संख्येत आणखी एका स्थानकाची भर; २१ पासून सेवेत

विधेयकातील तरतुदी पाहता महिला आरक्षण विधेयक “इव्हेंट मॅनेजमेंट”शिवाय दुसरे काहीही नाही. लोकसभा व विधानसभेतील ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याआधी जनगणना होणे गरजेचे आहे. २०२१ साली होणारी जनगणना मोदी सरकारने अद्याप केलेली नाही, तसेच मतदारसंघ पूनर्रचना केल्यानंतरच हा कायदा लागू केला जाऊ शकतो. मतदार पुनर्रचना २०२६ साली होणार आहे. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी जनगणना आणि मतदारसंघ परिसिमन होईल का? हा खरा प्रश्न आहे, ही सर्व परिस्थिती पाहता महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर झाले तरी त्याची अंमलबजावणी लगेच होईल, असे दिसत नाही, असे ते म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 19:48 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×