बुलढाणा : प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून बडेजाव मिरवणाऱ्या जिल्ह्यातील ९ नेत्यांवर आता प्रदेश व जिल्हा काँग्रेस समितीची करडी नजर राहणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्राद्वारे दांडीबहाद्दर पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहे. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी पक्षाच्या आंदोलनात गैरहजर असतात किंवा आलेच तर एकटे येतात, असे प्रदेश काँग्रेसच्या निदर्शनास आले आहे. यामुळे या नेत्यांनी आता आंदोलनात स्वतः सहभागी होणे व सोबत किमान ४० कार्यकर्ते आणणे अपेक्षित असल्याचे पत्रात नमूद आहे.

हेही वाचा >>> गोड बातमी….कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘पाळणा’ हलणार ! तब्बल सात दशकानंतर भारतात चित्त्यांच्या जन्माचे वेध

Himachal Pradesh Politics
Himachal Pradesh Politics : हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत भाजपाच्या आमदारांकडून काँग्रेसच्या मंत्र्याचा जयजयकार; नेमकं काय घडलं?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
After Ajit Pawars visit NCP state general secretary resigned in Nagpur
अजित पवारांच्या दौऱ्यानंतर नागपुरात पक्षात पडझड, प्रदेश सरचिटणीसाचा राजीनामा
mahavikas aghadi jode maro andolan marathi news
महाविकास आघाडीचे आज ‘जोडे मारो’ आंदोलन; शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची उपस्थिती
Nagpur, narendra modi, vadhvan port grounbreaking, nana patole criticises pm narendra modi,
स्थानिकांचा विरोध डावलून मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमीपूजन, पटोले यांची टीका
Ladki Bahin Yojana, women candidates, assembly elections, mahayuti, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nagpur, political pressure, maha vikas aghadi, Congress, BJP, women empowerment,
लखपती दीदी, लाडकी बहीण खूप झाले, उमेदवारीचे बोला! राजकीय पक्षांवर…
With help of MLA Geeta Jain strategy to defeat BJP is being planned by cm Eknath Shinde
मीरा-भाईदरमध्ये मुख्यमंत्र्यांकडूनच भाजपची कोंडी
shishupal patle nana patole marathi news
भंडारा : भाजपाला धक्का! माजी खासदार शिशुपाल पटलेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

यावर जिल्हा काँग्रेसने नजर ठेऊन याचे पालन न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची तक्रारवजा माहिती प्रदेश काँग्रेसला काळविण्याचे आदेश बजावण्यात आले आहे. त्यामुळे राज्याप्रमाणेच जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारीदेखील पक्षाच्या रडारवर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दिल्ली दरबारी वजन असलेले ज्येष्ठ नेते खासदार मुकुल वासनिक यांचा जिल्हा म्हणून बुलढाणा ओळखला जातो. यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये जिल्ह्यातील ९ नेत्यांचा समावेश आहे. यात श्याम उमाळकर (मेहकर), विजय अंभोरे, संजय राठोड, जयश्री शेळके, गणेश पाटील ( बुलढाणा), रामविजय बुरुंगले ( शेगाव), हाजी दादूसेठ (चिखली) , धनंजय देशमुख ( खामगाव) व स्वाती वाकेकर ( जळगाव) यांचा समावेश आहे. या नेत्यांना आता या निर्देशांचे पालन करावेच लागेल, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.  जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनाही आंदोलन व  पक्ष कार्यक्रमाप्रसंगी  या नेत्यांवर नजर ठेवावी लागणार आहे. तसेच त्यांच्या सोबतच्या चाळीस कार्यकर्त्यांची मोजणी करावी लागणार आहे.