मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने दौड-मनमाड विभागातील बेलापूर, चितळी आणि पुणतांबा स्थानकांदरम्यान ‘नॉन-इंटरलॉकिंग’ काम करण्यासाठी काही गाड्यांना रद्द करण्यात आले. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येत आहे.कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस (२६ व २७ मार्च), गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस (२८ व २९ मार्च), नागपूर-पुणे गरीबरथ एक्सप्रेस (२६ मार्च), पुणे-नागपूर गरीबरथ एक्सप्रेस (२७ मार्च), नागपूर-पुणे एक्स्प्रेस (२७ मार्च), पुणे-नागपूर एक्सप्रेस (२८ मार्च) रद्द करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष अहीर यांच्या पुतण्याची आत्महत्या की हत्या? जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार

१२२२१ पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस २७ मार्चला पुणे-लोणावळा-पनवेल-कल्याण-मनमाड मार्गे वळवण्यात येत आहे. १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस २५ आणि २६ मार्चला नागपूर-बल्लारशाह-सिकंदराबाद-वाडी-दौड-पुणे मार्गे वळवण्यात येत आहे. २२८४६ हातिया-पुणे एक्सप्रेस २६ मार्चला नागपूर- बल्लारशाह- सिकंदराबाद- वाडी- दौड-पुणे मार्गे वळवण्यात येणार आहे.