CM Eknath Shinde on lionel messi world cup final: कतारमधील लुसेल स्टेडियमवर झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेटिनाने अतिरिक्त वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला ४-२ अशा फरकाने पराभूत करत तब्बल ३६ वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. ३५ वर्षीय अर्जेटिनाचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसीचा हा विश्वचषकातील अखेरचा सामना होता आणि त्याने आपल्या विश्वचषकातील प्रवासाची विजयी सांगता केली. मेसीने या स्पर्धेत सात गोल केले. चार वर्षांनी होणाऱ्या पुढील विश्वचषकात मेसी खेळणार नसल्याने त्याच्या विश्वचषकातील कारकिर्दाचा स्वप्नवत गोड शेवट झाला असं म्हणत चाहते अर्जेंटिना आणि मेसीचं कौतुक करत आहेत. असं असतानाच आज नागपूरमध्ये सुरु असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी थेट विधानभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेसीचं कौतुक केलं.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

सभागृहाचं कामकाज समजवून घेण्याच्या उद्देशाने सभागृहात आलेल्या काही निवडक विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी मार्गदर्शन केलं. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित ४९ व्या संसदीय अभ्यास वर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन झाले. सुरुवातीला मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहामधील कामकाज बऱ्याच तास चालतं पण सभागृह बंद पडल्यावर त्याची प्रसिद्धी अधिक होते असं म्हणत कामाकाजाबद्दल बोललं जात नसल्याची खंत व्यक्त केली. “सभागृहामध्ये मी अत्यंत अभिमाने सांगू इच्छितो की आमची दोन्ही सभागृह ज्या पद्धतीने चालतात ते पाहिल्यास कामाच्या तासांची प्रसिद्धी कमी होताना दिसते. पण सभागृह बंद पडलं की त्याची प्रसिद्धी जास्त होते. आपण या अभ्यास वर्गाचा फायदा घ्या,” असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

UP & Hariyana CM To Be Changed Viral Claim
यूपीचे मुख्यमंत्री बदलणार? योगी आदित्यनाथ यांच्या बदलीसाठी भाजपाच्या प्रसिद्ध नेत्याचं पत्र व्हायरल; कुणाची झाली शिफारस?
CM Eknath Shinde Reaction After Narendra Modi Oath
मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर एकनाथ शिंदेंची खास पोस्ट, “…उराशी बाळगलेलं स्वप्न”
ajit pawar on cabinet berth
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रीपदाचं काय झालं? खुद्द अजित पवारांनीच केली स्पष्टोक्ती; म्हणाले, “येत्या २-३ महिन्यांत…”
Murlidhar Mohol and Raksha Khadse
PM Narendra Modi Oath Taking Ceremony : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी, ७१ खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!
News Article on Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांचे पंख भाजपा पक्षश्रेष्ठींनी कापले नसते तर लोकसभा निवडणुकीतलं महाराष्ट्रातलं चित्र वेगळं असतं का?
What CM Eknath Shinde Said About Devendra Fadnavis?
देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
ajit pawar sharad pawar Sudhakarrao Naik
“…म्हणून २००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”, सुधाकरराव नाईकांचा उल्लेख करत अजितदादांनी सांगितली पवारांची भीती
Anil Parab On Ashish Shelar Eknath Shinde Uddhav Thackeray
“आशिष शेलार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये वाद”; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

मेसीचा उल्लेख

पुढे मुख्यमंत्री शिंदेंनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचं महत्त्व समजावून सांगताना फुटबॉल विश्वचषकामधील मेसीच्या खेळाचं उदाहरण दिलं. “उदाहरण द्याचं झालं तर परवा आपण जो काही फुटबॉल विश्वचषकाचा सामना पाहिला तर त्याच्यामध्ये मेसीला आपण पाहिलं. मेसीने तर कमाल केली. हा मेसी काय एका दिवसात घडलेला नाही. अर्जेंटिनाचा जग्गजेता संघ उभा करण्यामागे जिद्द, चिकाटी, मेहनत अशा सगळ्याच गोष्टी आहेत. डेडिकेशन, डिव्होशन अशा साऱ्याच गोष्टी यात आहेत. हे करत असताना त्यामागे त्याग आणि इतरही बऱ्याच गोष्टी असतात. अशी उदाहरणं अनेक आहेत,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या गोष्टी टाळू नये…

तसेच, “क्षेत्र कुठलं असलं तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या गोष्टी आपल्याला टाळता येत नाहीत आणि त्या टाळूनही नये,” असा सल्ला मुख्यमंत्री शिंदेंनी विद्यार्थ्यांना दिला.

दरवर्षी भरतो वर्ग

दरवर्षी हिवाळी अधिवेशनात राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे अभ्यास वर्ग भरवला जातो. विधानपरिषदेच्या सभागृहात हा वर्ग चालतो. कामकाज सुरु होण्याच्या १५ मिनीटे आधी हा वर्ग संपतो. सकाळी ९ ला वगैरे सुरु होतो, तास -दिड तास चालतो. संसदीय- विधिमंडळ कामकाज, लोकशाही वगैरे विषयांवर विविध आमदार यावेळी मार्गदर्शन करतात.