लोकसत्ता टीम

नागपूर: नागपूर लोकसभा मतदार संघात यंदा भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे. सहाव्या फेरीत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्याहून सुमारे ३ हजार ४४० मते जास्त घेतली.

charulata tokas
‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….
Nagpur congress
विधानसभेची नांदी, नव्या उमेदवाराला संधी… काँग्रेस दक्षिण नागपूरमध्ये…
nana patole on congress mla cross voting
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचा दावा; नाना पटोले म्हणाले, “ज्या आमदारांनी…”
narsayya adam, narsayya adam master,
विधानसभेची उमेदवारी गृहीत धरून नरसय्या आडम यांचे ‘व्होट भी-नोट भी’ अभियान सुरू 
Abhishek Banarjee
लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवर तृणमूल काँग्रेसचा आक्षेप; खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “एकाने जरी…”
om birla loksabha speaker
बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकमताने निवड; कोण आहेत ओम बिर्ला?
Chief Minister eknath shinde visit to campaign in Nashik Teachers Constituency today
नाशिक शिक्षक मतदारसंघातील प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांचा दौरा
kiran choudhry joins bjp
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेचाच भाजपात प्रवेश

नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. सहा फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. भाजप उमेदवार व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या मताधिक्य प्रथम सलग पाच फेऱ्यांमध्ये वाढतांनाचे चित्र होते. परंतु सहाव्या फेरीत नितीन गडकरी यांच्यातून विकास ठाकरे यांनी ३ हजार ४४० मते जास्त घेतली. त्यामुळे गडकरी यांचे मताधिक्य सहाव्या फेरीत कमी झाले. सहाव्या फेरीनंतर नितीन गडकरी यांनी एकूण २ लाख २३ हजार ८१० मते मिळाली. तर विकास ठाकरे यांना १ लाख ७९ हजार ८५२ मते मिळाली. आता पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा-Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अकोल्यात काँग्रेस व भाजपमध्ये लढत; डॉ. अभय पाटील यांची पहिल्या फेरीपासून आघाडी

दरम्यान नागपुरातील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मोठे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जाते. मागील दोन्ही निवडणूक त्यांनी मोठ्या मताधिक्‍याने जिंकली आहे. यामुळे ते यावेळी ते किती मताधिक्‍य घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गडकरी यांनी विजयाची खात्री असल्याचे आधीच म्हटले आहे. तर नागपूरमधील दलित- मुस्लिम- कुणबी असा “डीएमके’ फॉर्म्युला चालल्याने विकास ठाकरे विजयी होतील असा काँग्रेसचा दावा होता.