वीर सावरकर यांच्या बाबत खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी शेगावात पोहोचण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दुपारी राज्य उपाध्यक्ष तथा अकोला बुलढाणा वाशीमचे संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार यांच्या नेतृत्वात विदर्भातील मनसे कार्यकर्ते पोलिसांना हुलकावणी देत शेगाव शहरातील गौलखेड रोड वर पोहोचले! होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सदर परिसरात नाकेबंदी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले.

हेही वाचा >>>नागपूर: खंडणीच्या आरोपानंतर धवनकरांनी दिले माध्यमातील ‘मूल्यां’चे शिक्षण, काही घडलेच नसल्याचा आव आणत घेतला दोन तासांचा वर्ग

Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
sanjay raut slams raj thackeray
Raj Thackeray : नवनिर्माणचं ‘नमोनिर्माण’ होण्यामागे कारण काय? संजय राऊत यांची राज ठाकरेंवर खोचक टीका
Sadabhau Khot on Devendra Fadnavis
“एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार”; सदाभाऊ खोत यांचे विधान

कार्यकर्त्यांना आपल्या वाहनांमध्ये बसून वाटिका चौकात आणून सोडले. मनसे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केले आंदोलनची तीव्रता पाहता पुन्हा या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना फार मेहनत घ्यावी लागली. तत्पूर्वी मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचविले होते. वाटिका चौकामध्ये कार्यकर्त्यांनी राहुल गांधी मुर्दाबाद वीर सावरकर जिंदाबादच्या गगनभेदी घोषणा दिल्या .