नागपूर: कोराडीतील प्रस्तावित एकूण १,३२० मेगावॅटच्या वीज प्रकल्पाला भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. विकास ठाकरे यांच्यासह विविध पर्यावरणवादी संघटना, स्वंयसेवी संघटनांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात भर दुपारी १२ वा. जनसुनावणी आयोजित केली आहे.२९ मे रोजी दुपारी १२.३० वाजता प्रकल्प कार्यालय परिसरात जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> एक वेब डेव्हलपर, दुसरा वसुली एजंट….डॉक्टरला मागितली खंडणी अन्… झटपट पैसे कमावण्याच्या नादात थेट पोहोचले कारागृहात

Surrogate Mother Case, First in nagpur, Approved, Surrogacy Act 2021, District Medical Board,
नवीन कायद्यानुसार नागपुरात पहिल्या ‘सरोगेट मदर’ प्रकरणास मंजुरी
Farmers aggressive
गडचिरोली : ‘एमआयडीसी’ भूसंपादनप्रकरणी शेतकरी आक्रमक; जमीन मोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठवले
electric bus
कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी एकत्रित बस सेवेचा विचार; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती
pune municipal corporation, Lahuji Vastad Salve, Memorial, Announces, maharashtra government, Sangamwadi,
पुणे : लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा

कोराडीतील सध्याच्या वीज प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असताना व त्याचा फटका शेतकरी, परिसरातील नागरिकांना बसत असताना याच प्रकल्पात आणखी नव्याने दोन संच लावणे प्रस्तावित आहे. प्रदुषणाच्या कारणावरून त्याला प्रचंड विरोध होत आहे.. ‘विदर्भ कनेक्ट’ या संघटनेने यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. गडकरी यांनीही यासंदर्भात उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हा प्रकल्प पारशिवनीत स्थानांतरित करा,अशी विनंती केली. त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व याच पक्षाचे स्थानिक आमदार विकास ठाकरे यांनीही हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. स्वंयसेवी संघटना, पर्यावरणवादी संघटनांचा प्रकल्पाला विरोध आहे. माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही विरोध केला आहे. या सर्वांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सोमारी २९ जून रोजी दु. १२ वा. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कोराडी वीज प्रकल्पाच्या सभागृहात जनसुनावणी आयोजित केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे जनसुनावणीत नागरिकांना ऑनलाईनही सहभागी होता येणार आहे. दरम्यान प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेता जनसुनावणी वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आणि प्रकल्पविरोध विविध संघटनांनी सुनावणीस लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकांच्या माध्यमातून केले आहे.