नागपूर: कोराडीतील प्रस्तावित एकूण १,३२० मेगावॅटच्या वीज प्रकल्पाला भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. विकास ठाकरे यांच्यासह विविध पर्यावरणवादी संघटना, स्वंयसेवी संघटनांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात भर दुपारी १२ वा. जनसुनावणी आयोजित केली आहे.२९ मे रोजी दुपारी १२.३० वाजता प्रकल्प कार्यालय परिसरात जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> एक वेब डेव्हलपर, दुसरा वसुली एजंट….डॉक्टरला मागितली खंडणी अन्… झटपट पैसे कमावण्याच्या नादात थेट पोहोचले कारागृहात
कोराडीतील सध्याच्या वीज प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असताना व त्याचा फटका शेतकरी, परिसरातील नागरिकांना बसत असताना याच प्रकल्पात आणखी नव्याने दोन संच लावणे प्रस्तावित आहे. प्रदुषणाच्या कारणावरून त्याला प्रचंड विरोध होत आहे.. ‘विदर्भ कनेक्ट’ या संघटनेने यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. गडकरी यांनीही यासंदर्भात उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.