नागपूर : दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. विशेष म्हणजे, ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आला.

दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनकाळात देशभरातून येणारे मराठी सारस्वत व साहित्यप्रेमींच्या निवासाकरिता जुन्या महाराष्ट्र सदनातील सर्व खोल्या मिळाव्या, यासाठी सरहद या आयोजक संस्थेने ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारला विनंतीपत्र दिले होते. परंतु, सदन सशुल्क द्यायचे की नि:शुल्क यावर प्रशासकीय स्तरावर मागच्या चार महिन्यांपासून खल सुरू होता. या संदर्भात निर्णय होत नसल्याने आयोजकांपुढेही मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता. याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरुवारच्या अंकात प्रकाशित केले. त्यानंतर मात्र गतीने हालचाली झाल्या व स्वत: मुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. आयोजकांनी यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
Shelu and Wangani housing project opposed by mill worker
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
Comprehensive development of the village in Palghar district with the help of schemes
समृद्ध गावांसाठी खोमारपाडा प्रारूप; योजनांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील गावाचा सर्वांगीण विकास
Walmik Karad, Nagpur , Winter Session Nagpur,
…तर नागपुरातच सापडला असता वाल्मिक कराड!
CIDCO , House Rates CIDCO ,
सिडकोच्या घरांचे दर दोन दिवसांत
special train service date extended by konkan railway
नववर्षात कोकण रेल्वेवरील विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ

हेही वाचा >>>जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरण : आरोपी चेतन सिंह मानसिक आजाराने ग्रस्त, अकोला 

राज ठाकरेसचिन तेंडुलकर ‘साहित्य संवाद’?

दिल्लीतील संमेलनात मनसेप्रमुख राज ठाकरे व सचिन तेंडुलकर यांचा ‘साहित्य संवाद’ रंगण्याची शक्यता आहे. साहित्य महामंडळाने या दोघांनाही संमेलनातील एका विशेष सत्रासाठी निमंत्रित केल्याची माहिती आहे. त्यांचा होकार मिळाला तर सुनंदन लेले हे दोघांशी महाराष्ट्रातील साहित्य, संस्कृती, संगीत, कला या विषयांवर संवाद साधतील.

Story img Loader