बुलढाणा: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि वाद हे समीकरण जुळलेलेच! आज त्यांच्या उपस्थितीत बुलढाणा जिल्ह्यात आयोजित शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम देखील असाच वादग्रस्त ठरला.

उन्हाळी सुट्ट्या संपल्यावर विदर्भातील शाळा सोमवारी, २३ जून रोजी सुरु झाल्या. या निमित्त जिल्ह्या भरातील शासकीय व खाजगी शाळात प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर ( तालुका देऊळगाव राजा ) येथे प्रवेश उत्सव अर्थात विध्यार्थ्यांच्या स्वागताचे आयोजन करण्यात आले होते. सिनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या कार्यक्रमासाठी थेट शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र मंत्र्यांच्या आगमनपूर्वी आणि विध्यार्थ्यांच्या स्वागतापूर्वी जिल्हा परिषद शाळेत वेगळाच प्रकार घडला.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता करून घेतली. झाडणे, कचरा गोळा करणे, माती उचलणे, वस्तूंची ने आण करणे आदी कामे लहान विध्यार्थ्यांकडून करून घेण्यात आल्याचा संतापजनक प्रकार सिनगांव जहांगीर ( ता देऊळगाव राजा) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये घडला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सिनगाव जहागीर येथे आयोजित प्रवोशोत्सव साठी आले होते. शिक्षण मंत्री दादा भुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार होते . मात्र दादा भुसे पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळा झाडणे, कचरा उचलणे या कामाला लावले. एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडूनच शालेय काम करून घेण्याचा सपाटा शाळेत दिसून आला. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली.

दरम्यान जालना येथून नामदार भुसे यांचे सिनगाव जहांगीर येथे आगमन झाल्यावर शाळेत प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधिनी त्यांना या प्रकरणी विचारणा केली. तसेच त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार करून कारवाईची मागणी केली. यावेळी गावातील काही मंडळी आक्रमक झाल्याचे दिसून आले. अगोदर सारवा सारव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भुसे यांनी शेवटी संबंधिताची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी मंत्री म्हणाले की असा (विध्यार्थ्यां कडून साफसफाईचा) प्रकार घडला असेल तो चुकीचा आहे. या प्रकरणी ‘ ज्याने चुकीचे काम केलं असेल त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षणासोबत नौटंकी नको : जयश्री शेळके

यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या अॅड जयश्री शेळके यांना विचारणा केली असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.शालेय प्रवेशाचा पहिला दिवस असून विद्यार्थ्यांना राबवून घ्यायचे आणि पुन्हा त्यांचेच बिस्किट पुडा देऊन स्वागत करायचे, हे अयोग्य आहे.महायुती सरकारने आणि शिक्षण विभागाने ही नौटंकी बंद करावी, असे मत व्यक्त केले.