वर्धा : शालेय जीवनात दहावी व बारावीच्या परीक्षा सर्वात महत्वाच्या समजल्या जातात. त्यासाठी विद्यार्थी, पालक, शाळा सर्व जय्यत तयारी करतात. शेवटी निकाल उत्सुकतेचा असतो. निकाल लागला की मग गुणपत्रिका लवकर हाती पडावी, याची धडपड सूरू होते. तसेच प्रमाणपत्र म्हणजे सनद हाती मिळावी, याची पण . शालेय जीवनातील हे दोन्ही Cerificate महत्वाचे पण एकाचवेळी मिळत नाही. ही उणीव समजून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ( MSBSHSE ) या संस्थेने एक निर्णय घेतला आहे.

नवा बदल

पूर्वी निकाल जाहीर झाला की फक्त गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडत असे. तर सनद म्हणजेच बोर्ड प्रमाणपत्र अनेक महिने लोटल्यावर विद्यार्थ्यांना प्राप्त होई. त्यामुळे अडचण येत असे. कारण विद्यार्थी व संबंधित संस्थांना गुण पडताळणी करण्यास उशीर लागायचा. ही तफावत दूर करणे शिक्षण मंडळास आवश्यक वाटले. म्हणून बदल करण्याचा निर्णय झाला आहे. आता हे दोन्ही प्रमाणपत्र एकाच वेळी हाती पडणार.

ऐतिहासिक निर्णय

हा एकाच वेळी दोन्ही प्रमाणपत्र देण्याचा निर्णय ऐतिहासिक म्हटल्या जात आहे. कारण दोन्ही एकाच वेळी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार. प्रक्रिया सुलभ होईल. व प्रामुख्याने फसवणूक करण्याचा प्रकार टळणार, असे सांगण्यात येते. गुणपत्रिका व प्रमाणपत्र हे दोन्ही एकत्रित दिल्या जातील. या एकत्रित प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचा फोटो राहणार. एक कर कोड त्यात दिल्या जाईल. त्याचा असा फायदा होणार की दिलेल्या एकत्रित ( Consolidated Document ) प्रमाणपत्राची ओळख व सत्यता अचूक पडताळता येणार. हे कायमस्वरूपी राहील.

भविष्यासाठी उपयुक्त

हा एकत्रित दस्तावेज वर्तमान Dijital युगात सुरक्षित ठरणार. सुलभ व विश्वासनीय साधन ठरणार. QR कोड महत्वाचा. त्याच्या मदतीने महाविद्यालय, विद्यापीठ किंवा प्रवेश देणाऱ्या शिक्षण संस्था यांना कागदपत्रांची लवकर तपासणी करता येणे शक्य होणार. भविष्यातील शैक्षणिक व प्रशासकीय कामासाठी ही बाब उपयुक्त ठरेल. QR कोडमुळे पटकन तपासणी होणार. मंडळाच्या अधिकृत अँपवर स्कॅन केल्यास Marksheet बाबत खरे तेच दिसेल.

आधारकार्ड हा निकष

दोन्ही प्रमाणपत्र एकत्रित दिले जाणार. नव्या बदलाने फसवणूक टळणार. यावरील विद्यार्थ्यांचे नाव आधार कार्डनुसार प्रिंट होईल. निम्मी अक्षरे वेगवेगळ्या क्रमाने उमटणार. त्यामुळे ती दिसायला सहज व एकसमान दिसतील. गुणपत्रिकेत विद्यार्थी फोटो व QR कोड समाविष्ट राहणार. त्यामुळे फसवणूक करण्यावर नियंत्रण येणार, अशी हमी दिल्या जात आहे. प्रवेश देणाऱ्या संस्थेसाठी ही बाब डोकेदुखी दूर करणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केल्या जातो.