नागपूर: नवीन गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीत मदत व्हावी म्हणून महारेराकडून नवीन क्लृप्तीवर काम सुरू आहे. त्यानुसार महारेराकडून मुंबईच्या धर्तीवर नागपूर, पुणे येथे प्रत्येक महिन्यात विशेष खुले सत्र घेतले जाणार आहे. त्यानुसार पहिले सत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर नागपुरात होणार आहे. या खुल्या सत्राबाबत जाणून घेऊ या.

नवीन गृहनिर्माण प्रकल्पाची महारेराकडे  नोंदणी करताना ते सदस्य असलेल्या स्वयंविनियामक संस्थांच्या तज्ज्ञांची मदत होत असली तरी विकासकांना पुरेशा माहिती अभावी अडचणींना सामोरे जावे लागते.  या शंका समाधानासाठी महारेराच्या मुख्यालयात दर आठवड्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खुले सत्र होते. त्यात संबंधितांचे प्रकरणपरत्वे शंका समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अशा पद्धतीचे खुले सत्र नागपूर, पुणे येथे व्हावे अशी विकासकांची मागणी होती. म्हणून महारेराने नागपूर, पुणे येथे महिन्यातून एकदा पूर्व घोषित वेळापत्रकानुसार  गृहनिर्माण प्रकल्प नोंदणीशी संबंधित मुख्यालयातील न्यायिक,  आर्थिक आणि तांत्रिक विभागांच्या  अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खुले सत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात नागपूर पासून करण्यात येत आहे.

jitendra awads broadcast thane municipal corporation demolished illegal construction in Mumbra
जितेंद्र आव्हाडांच्या थेट प्रेक्षपणानंतर पालिकेकडून ‘ती’ इमारत जमीनदोस्त, मुंब्र्यात भररस्त्यावर अनधिकृत इमारतीचा घाट
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Due to increasing urbanization 36th police station in nagpur is located in Garoba Maidan area
उपराजधानीत ३६ वे पोलीस ठाणे, वाढत्या शहरीकरणामुळे गरोबा मैदान परिसरात…
new building construction hearing thane Municipal Corporation tree cutting Raymond company
रेमंड येथील वृक्षतोडी संदर्भात महापालिकेत सुनावणी
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
To meet its budget target Pune municipal corporation plans to collect Rs 10 crore daily in taxes
दररोज १० कोटीची वसुली करा, कोणी दिले आदेश !
Democracy Day held monthly on first Monday to address citizen issues and improve communication
पिंपरी : महापालिकेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन; तक्रार महिन्याभरात निकाली…

हेही वाचा >>>आता झाडे योरुबा भाषेत बोलणार! नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापकाचा…

महारेराने नुकताच घेतला हा निर्णय…

मुंबई महाप्रदेशाबाहेरील विकासकांच्या अधिकृत संघटनांना स्वयंविनियामक संस्था स्थापन करता यावी म्हणून किमान ५०० प्रकल्पांचा निकष २०० पर्यंत कमी करण्याचा निर्णय नुकताच महारेराने घेतला. उर्वरित महाराष्ट्रातील विकासकांना  दिलासा देणारा महारेराचा हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय आहे.

नवीन नोंदणीक्रमांक मिळण्यासाठी आवश्यक…

कुठल्याही नवीन गृहनिर्माण प्रकल्पाची महारेराकडे रितसर नोंदणी केल्याशिवाय त्या प्रकल्पाची जाहिरात करता येत नाही. विक्री करता येत नाही. नवीन गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीसाठी  कागदपत्रे सादर करताना त्यात अंतर्गत विसंगती राहणार नाही ,याचीही विकासकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय विकासकांनी महारेराला अपेक्षित असलेल्या सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केल्यास त्यांना लवकरात लवकर नोंदणीक्रमांक मिळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा >>>कुंभमेळ्यासाठी जातंय तर हे वाचाच! भाविकांच्या सुविधेसाठी…

महारेराचे अध्यक्ष काय म्हणतात?

“नवीन गृहनिर्माण प्रकल्पाला नोंदणीक्रमांक देण्यासाठी  महारेराने कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक मापदंड काय असावेत हे स्पष्टपणे ठरवून दिले आहेत. प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाला महारेरा  नोंदणीक्रमांक मिळणे सुकर व्हावे म्हणून मुख्यालयात आठवड्यातून एकदा संबंधित अधिकाऱ्यांसोबत खुल्या सत्राच्या माध्यमातून समोरासमोर शंका निरसन करण्यात येते. इतके दिवस फक्त मुख्यालयात होणारे हे खुले सत्र या महिन्यापासून दर महिन्यात एकदा नागपूर व पुणे येथे सुरू करीत आहोत. त्याची सुरुवात नागपूरपासून करीत आहोत. प्रकल्प नोंदणी प्रक्रियेत सर्वतोपरी मदत करण्याचा महारेराचा प्रयत्न आहे.” – मनोज सौनिक, अध्यक्ष, महारेरा

Story img Loader