उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आता उपराजधानी नागपूर शहराची स्थापना करणारे गोंड राजे बख्त बुलंदशहा यांचे नाव नागपूर नगरीला द्या, अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने बुधवारी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव, असे नामांतर करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यापाठोपाठ काँग्रेसने पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करण्यात यावे, अशी मागणी केली. तर आदिवासी संघटनांनी नागपूर शहरला बख्त बुलंदशहा नगर असे नामकरण करण्याची मागणी केली आहे.

Kolhapur Congress candidate Chhatrapati Shahu Maharaj is the most rich candidate
शाहू महाराज सर्वाधिक ‘श्रीमंत’ उमेदवार; स्थावर, जंगम अशी २९७ कोटींची संपत्ती
220 former corporators of Kolhapur with the support of Shrimant Shahu Maharaj Chhatrapati
कोल्हापुरातील २२० माजी नगरसेवक श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी
MP Dhairyashil Mane should be in Delhi when Narendra Modi takes oath for the third time says Suresh Halvankar
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेताना खासदार माने दिल्लीत हवेतच- सुरेश हाळवणकर
MP Sanjay Mandlik felicitated by NCP District President Babasaheb Patil Asurlekar
तर शाहू महाराजांना राज्यसभेवर का पाठवले नाही? संजय मंडलिक यांचा सवाल

यासंदर्भात ऑर्गनायजेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मरसकोल्हे म्हणाले, अलीकडे शहरांची नावे बदलली जात आहेत. राज्याची उपराजधानी नागपूर नगरी आदिवासी शासक व राजे बख्त बुलंदशहा यांनी वसवली होती. त्यामुळे या शहराला बख्त बुलंदशहा नगर असे नाव देण्यात यावे, अशी मागणी आदिवासी समुदाय आणि संघटनांची आहे. या मागणीला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नागपूर विभागाने समर्थन दिले आहे.