लोकसत्ता टीम

बुलढाणा : बातमीचे शीर्षक वाचून वाचक बुचकळ्यात पडणार, त्यांचा गोंधळ उडणार हे नक्की! हिंदी चित्रपटसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्यात दारूवरून वाद आणि चाकू हल्ला… मात्र वाचकांनी गोंधळून जाण्याचे आणि बुचकळ्यात पडण्याचे काही काम नाहीये बरं का! कारण बातमीतील शाहरुख खान आणि आमिर खान जगविख्यात बॉलिवूडचे सुपर स्टार नसून ते विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमधील रहिवासी आहेत.

Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
Sambhaji Nagar Accident
“रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या”, बहिणीचा गंभीर दावा; म्हणाली, “३०-४० किमी लांब येऊन…”
flesh eating bacteria in japan
जपानमध्ये मांस खाणार्‍या जिवाणूचा उद्रेक, ४८ तासांत माणसाचा मृत्यू; हे जीवाणू जगभरात थैमान घालणार?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
cm eknath shinde ajit pawar raigad marathi news
Video: भाषण चालू असताना एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ कृतीमुळे अजित पवारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य; उपस्थितांमध्ये मात्र हशा!
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
kashmira pawar satara arrested forged as pmo appointed
साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”

त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला, त्याचे पर्यवसन चाकू हल्ल्यात झाले. यातील शाहरुख खान हा आता ठाण्यात जमा ( गजाआड) झाला असून आमिर खान हा रुग्णालयात उपचार घेत आहे. या दोघांच्या भांडणामुळे आता त्यांच्या परिवारातील मंडळी मात्र हकनाक हैराण झाले आहे. त्यांच्यावर पोलीस ठाणे, रुग्णालय आणि न्यायालयाची वारी करण्याची पाळी या दोघांमुळे आली आहे.

आणखी वाचा-कोट्यवधी रुपयांची फसवणूक; पण खातेदार म्हणतात, “पोलीस केस नको”, अखेर आमदारांचा हस्तक्षेप

दारू पिण्यासाठी किंवा व्यसनासाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. त्या नादात मध्यप्रेमी काहीही करायला तयार होतात याचे उदाहरण म्हणजे शेगाव येथील ही खळबळजनक घटना होय.

मिल्लत नगर मधील थरार

शेगाव मधील मिल्लत नगर मध्ये हा घटनाक्रम घडला. त्याचे झाले असे की, शाहरूख खान चांद खान ( वय बत्तीस वर्षे, राहणार मिल्लत नगर शेगाव) याला दारू प्यायची खूपच इच्छा झाली. मात्र खिशात पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या घरासमोर निवांतपणे उभ्या असलेल्या आपला मित्र आमिर खान सलीम खान (वय बावीस वर्षे, राहणार मिल्लत नगर, शेगाव) याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र आमिर खान याने त्यास स्पष्ट नकार देत आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. यावर शाहरुख खान याने आमिरच्या खिश्यात हात घालून पैसे काढायचा प्रयत्न केला. यावर आमिर खानने त्याला बाजुला ढकलले. यामुळे आधी दोघात कडाक्याच्या वाद झाला.

आणखी वाचा-विदर्भातील शाळा १ जुलैपासून सुरू होणार, शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांना दिल्या या सूचना

दारूची तल्लफ आणि मित्राचा पैसे देण्यास नकार यामुळे संतापलेल्या शाहरुख खान याने प्रथम आमिरला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.तरीही तो पैसे देत नसल्याने शाहरुखने खिश्यातील चाकू काढून आमिर खान याच्या वर सपासप वार केले. त्यामुळे आमिर खान च्या बरगडी आणि डोळ्याजवळ जखमा होऊन तो रक्तबंबाळ झाला. दरम्यान आमिर खान याने आरडाओरड केल्यावर परिसरातील नागरिकांनी त्याला शाहरुख च्या तावडीतून सोडविलें. यावेळी त्याने, ‘पोलिसात तक्रार केली तर कारागृहातून परत आल्यावर ठार करण्याची धमकी सर्वांसमक्ष दिली.

याप्रकरणी आमीर खान सलीम खान (राहणार मिल्लत नगर, शेगाव ) यांनी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपी शाहरुख खान चांद खान (राहणार मिल्ल्त नगर) याच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शेगाव पोलीस करत आहेत.