नागपूर : दुचाकी वरील चालकासह मागे बसलेल्या व्यक्तीस हेल्मेट सक्तीचे हा एक सर्वसाधारण जनमानसाला त्रासदायक निर्णय आहे. या मागचे कारण संरक्षण एवढेच आहे की आणखी काही असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. अपघातामध्ये हेल्मेट मुळे संरक्षण होते असे म्हणणे मर्यादेपर्यंत सत्य आहे. पण हेल्मेट असले आणि अपघात झाला की काहीही होत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ आणि प्रवासी महासंघाचे सरचिटणीस अशोक पात्रीकर यांनी म्हटले आहे.
आपल्या वक्तव्याप ते म्हणतात हेल्मेट सक्तीला अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि प्रवासी महासंघाने सुरुवातीलाच विरोध केला होता आणि तो आहे कारण शहरातच फिरताना हेल्मेट असलेच पाहिजे हे पटण्यासारखे नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासात चालक स्वतःच हेल्मेट घालून प्रवासास निघतो. पण शहरातल्या शहरात अंतर्गत रस्त्यावरही हेल्मेट सक्तीचे करणे हे पटना जोगे नाही. आता त्यातच प्रशासकीय निर्णयाने मागच्या सीटवर बसलेल्या प्रवासालाही हेल्मेट सक्तीचे केले आहे. ही बाब नव्या समस्या निर्माण करणारी आहे. साधारण आर्थिक स्थिती असलेले लोक दुचाकी वाहनाचा कार्यालयात जाण्यास, कौटुंबिक भेटीगाठी साठी जाण्यास, काही महत्त्वाची कौटुंबिक अंतर्गत कामे करताना वापरतात प्रत्येक वेळेस दोघांनीही हेल्मेट लावणे नंतर त्या हेल्मेटिक ठेवण्याची व्यवस्था करणे हा एक नवीनच अडचणीचा प्रकार आहे. विशेष म्हणजे बाजारात मिळणारे हेल्मेट हे आयएसआय मार्क असतीलच असे नाही त्यात मोठ्या प्रमाणावर बनवाबनवी सुरू आहे या बाबी यापूर्वी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने समोर आणले आहे त्याची पूर्ण निराकरण ही अद्याप झालेले नाही अशा स्थिती त आता ही नवीन निर्णयाची उठा ठेव प्रशासनाने केली आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी आहे कृपया हा निर्णय मागे घेण्यात यावा.
हेही वाचा…रस्ते फक्त माणसांसाठीच असतात का..? एका बिबट्याचा सवाल
आणि ग्राहकाला दिलासा द्यावा.. त्यापेक्षा अती क्रमाने, रहदारीतील गडबडीत, रस्त्या रस्त्यावर टाकले जाणारे मांडव आणि बंद केला जाणारा रस्ता, ज्येष्ठांसाठी असणारे फुटपाथ कुठेही मोकळे नसणे, त्यावर हक्काने अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना झोपवणे अशी कामे पोलिसांनी करावी. सर्वाधिक अपघात अतिक्रमण आणि वारंवार खोदल्या जाणाऱ्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे, अंडर ब्रिज मध्ये पाणी साठण्यामुळे होतात याकडे कोण लक्ष देईल. प्रवाशांची ग्राहकांची चिंता करायची असेल तर कृपया प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावी कुठलातरी एखादा निर्णय घेऊन प्रशासनाला सामान्य जनतेची किती काळजी आहे हे दाखवणे बंद करावे..