वर्धा : बालपण अंधारात पण पुढे प्रकाश खेचून आणलाच. ही प्रकाशवाट सापडली ती मंगेशी मून यांच्या उमेद आश्रयालयात. झोपडपट्टीत राहणाऱ्या, भीक मागणाऱ्या मुलांसाठी हे नंदनवन. त्यांचे आयुष्य बदलवून टाकणारे. रेणुका अशीच एक कळी. मुंबईच्या सानपाडा पुलाखाली तिचा जन्म व बालपण गेले. ती मग मंगेशी यांच्या हाती लागली आणि पैलू पडत गेले. रेणुकाची कहाणी मंगेशी मून यांच्याच शब्दात बघा.

बिनधास्त बेडर रेणुका

रेणुका, ती साधारण सहा वर्षांची असतांना रेणुका आमच्या उमेद संकल्प मध्ये आली. आली तेव्हा २५ मुलांबरोबर एकटी राहिली. एव्हढी बिनधास्त होती की, कुणालाच ऐकायची नाही. थोड्या दिवसांनी मुलंमुली वाढल्या आणि ती सगळ्यात मिसळत गेली. दिवस हळूहळू उलटु लागले तशी ती एक एक वर्ग पुढे जात राहीली पण तीचे आईवडील आणि तिचा समाज तिला पुढे जाण्यास थांबवत होता. तिने मात्र सगळ्यांना झुगारून शिकायचं ठरवलं. रस्त्यावर भीक मागणारी रेणुका, शिक्षणाच्या प्रवाहात येईल अस कधी वाटलं नव्हतं . पण ती गरवारे सारख्या शाळेतून 65% टक्के घेऊन दहावी उत्तीर्ण झाली. हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.

वर्धा पारधी बेडा ते मुंबई

खर तर ती वर्ध्याजवळच्या पारधी बेड्यावर रहात होती . पण ती तिच्या आईवडील सोबत नवी मुंबईत भिक मागायला जायची . सानपाडा ब्रिज खाली मोठ्या संख्येने पारधी राहत होते. त्यात आपली रेणुका सुद्धा ब्रिज खाली रहायची. दिवसाला तिला हजार , दिड हजार असे भिक मिळायचे. हे सर्व पैसे ती तीच्या आईवडिलांना दारु पिण्यास व व्यसन करण्यात साठी द्यायची , तेव्हा तिला फारस काही कळत नव्हते म्हणून ती आईबाबा म्हणेल तस करायच अस होत. मला जेव्हा ती भेटली तेव्हाच तिच्यातला तो रूबाबदार पणा जाणवला. तिच भविष्य काय असेल हे मलाही माहिती नव्हते पण तरीही तिला शिकवायचे असे ठरविले. त्यासाठी ती भेटावी म्हणून सारख्या चकरा मी ब्रिज खाली मारायची पण ती दिवस भर सानपाडा ते ठाणे असा लोकल प्रवासात भिक मागण्यांसाठी जायची त्यामुळे भेट होत नव्हती. रात्री त्यांचा ब्रिज खालचा परिसर पुर्ण नशा केलेला असायचा तेव्हा जाण थोड अवघड व्हायच म्हणून मी दिवसा माहीती घ्यायची, पण ती भेटत नव्ह्ती. मग एक दिवस सानपाडा लोकल पकडली आणि शोधात निघाले. ती दिसली पण आई असल्या कारणाने तीला भेटता आले नाही. शेवटी एका रात्री केले धाडस ब्रिज खाली जायचे . कुणीतरी माहीती सांगेल या आशेने गेली. तेव्हा रेणुका च्या बाबांच्या सावत्र वडिलांशी ओळख झाली. सुरुवात ीला वाटले हा व्यक्ती  इथल्या मुलांना शिकवायला वगैरे येत असेल कारण त्याच रहाणीमान खुप नीटनेटक होत. रूबाबदार असं, पांढरे शुभ्र कपडे पांढरे बुट त्यावरुन अंदाज बांधला कि हा पारधी नसावा. पण जेव्हा ओळख झाली आणि मी पण पारधीच आहे तसेच  रेणुका चा आजोबा आहे हे  कळल्यावर मी काही वेळ त्याच्या कडे बघत च राहीले.

जन्मनोंद व अन्य माहिती शून्य

मग हळुच माहीती काढायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्यावरुन वाटल कि यांचे गाव गाठायचे मग प्रवास सुरु झाला तो वर्धाचा. कागदपत्रे काहीच नाही जन्म ट्रेन किंवा स्टेशन, जन्माची  नोंद नाही शिकवायचं कसं हा प्रश्न होताच. त्यात तिचा एक मोठा भाऊ व लहान  बहीण  यांची हि माहिती मिळाली.  मी तिच्या आई-वडिलांना समजावले त्यांना ते पटले आणि शिक्षणासाठी द्यायला तयार ही झाले. मी प्रकल्पात घेऊन आली त्यांचे आईवडील नेहमीसारखे भिक माघायला गेले, पण काही केल्या भिक मिळत नव्हती परत माझ्या कडे आले आणि  आमचे मुल द्या अशी रट लावली. मी पण निर्णयावर ठाम होते. मुलं देणार नाही काय करायचं ते करा…अस बोलले पण ते काही ऐकायला तयार नव्हते. रोज कुणालातरी दारु पाजून प्रकल्पात आणायचे आणि रोज तमाशा..मी पण खुप त्रासली शेवटी पोलिसांच्या मदतीने त्यांना हाकलून लावले.तशी रेणुका ही माझ्या प्रकल्पातील पहिली मुलगी विद्यार्थी. बाकी सर्व मुलं… ती माझाकडे आली तेव्हा फार लहान व निरागस होती.

२५ मुलात एकटीच मुलगी

ती 25 मुलानं मधे एकटी मुलगी होती. ते पण फक्त 6 वर्षांची. मराठी तिला फारशी काही नीट बोलता येत नव्हती आणि भीक मागतांना बोलू नये असे शिकवल्याने जिभ सुद्धा जाड झाली होती. त्याकारणाने तिला शब्द स्पष्ट बोलता येत नव्हते. असे म्हणतात ना सराव आणि प्रयत्न या दोघांच्या साह्याने यश मिळवता येत तसेच तिच्या बाबतीत सुद्धा घडले. तिला काही महिन्यातच थोडं का होईना मराठी बोलता येऊ लागले. मराठी शिकवण्याचे मूळ कारण म्हणजे आम्हाला पारधी भाषा समजत नव्हती व शाळेत त्यांना मराठी माध्यमात अभ्यासक्रम होता. वेळ जाऊ लागला रेणुका एका लहान मुली पासून एका मोठ्या मुलीत बदलली.

मुलीला शिकवायचे नाही

पारधी बेड्यातली पहिली मुलगी म्हंटल्यावर लोकांना त्रास तर होणारच. बरीच लोक येऊन मुल घेऊन जाऊ लागली व आमच्या मुलींना शिकवायचं नाही अस सांगू लागली. मुली शिकल्या तर लवकर लग्न करणार नाही. त्यांना चांगला बेड्यातला मुलगा मिळणार नाही. जग कितीही पुढे गेले तरी ते बायकांना/मुलींना मागे ओढतचं होते. बेड्यातल्या लोकांनी रेणुका च्या आई-वडिलांना भडकवायला  सुरुवात केली व त्यांना वाळीत टाकले. रेणुका चे आई-वडिलांनी मला सांगितले . मी त्यांना समजाविले ते समजण्याच्या पलीकडे होते. त्यांना आता माझ्या कडे रेणुका नको होती. पण मी सतत विनवणी करत होते,  रेणुका ला माझ्या कडेच ठेवा असं , पण ते काही तयार नव्हते.कारण अजूनही बऱ्याचश्या समाजात मुली पाळी ला बसल्या की त्यांची लग्न लाऊन दिले  जात. अश्या कित्येक मुली रेणुका च्या बरोबरीच्या ंचे लग्न झालेत.  रेणुका माझ्याकडे असल्याने अस तिच्या बाबतीत झाले नाही आणि मी होऊही दिले नाही.

करोना आला धावून

पण नशिबाने कोरोना आला तिचे आईवडील परत आले. बेड्यात आणि आम्हालाही प्रशासनाकडून माहिती मिळाली होस्टेल खाली करायची. त्यावेळी कुठलाच मार्ग नव्हता म्हणून रेणुका पाच वर्षांनी बेड्यात गेली. वातावरण बघिल्यानंतर रहायची इच्छा नव्हती पण तीला मजबुरीने रहाव लागलं. काही दिवस राहली पण त्या वातावरणाची सवय नसल्याने ते दोघेही भावंड परत होस्टेल ल आले.  आम्ही कसेही राहु पण आम्ही होस्टेललाच राहु …त्यामुळे मला पर्याय नव्हता म्हणून मी पण काही बोलु शकली नाही. ते जसे रहायला आले तसेच त्यांच्या आईबाबा प्रकल्पात येऊन तमाशा करायला लागले. त्यावेळी दोघांनी ही आईबाबांना विरोध केला आणि यापुढे होस्टेल ला यायचे नाही अशी ताकीद दिली. ते नाईलाजाने मुंबईत परत गेले.

अखेर भाड्याने मुलं घेतली

त्यांनंतर तिच्या आईने ने कहरच केला काही दिवस भाड्याने  मुलं घ्यायला लागली. त्याच भाडं परवडत नव्हते म्हणुन मग ती स्वता: गरोदर राहीली. त्यावेळी रेणुका ची एक बहिण जबरदस्तीने घेऊन गेली. डिलिव्हरी नंतर परत पाठवितो असं म्हणून दोन्ही मुलिंना घेऊन मुंबईत आली. त्याचवेळी तिच्या लहान बहिनीचे आयुष्य खराब झाले. आता तीची बहिण कधीच शिक्षणात येणार नव्हती. कारण ती खुप मुरली होती त्या वातावरणात आता  दोघीही बहिणी भिक मागुन आईवडिलांचे व्यसन पुर्ण करत होत्या. आणि रेणुका आणि तिचा भाऊ प्रकल्पात रहात होते.

त्या मुली मध्ये  कमालीचे धाडस व शिकण्याची जिद्द होती. ती शाळेतून आल्यावर नियमीतपणे अभ्यास करत होती. अर्थातच मुलांना अभ्यासाला सांगत राहाव लागत तस तिला सांगायची गरज पडत नव्हती. तसेच तिला कुठली आवड नव्हती. पण कुत्र्यांच फारच वेड होतं . ती माझ्याकडे असलेल्या सगळ्या वेगवेगळया ब्रिड च्या कुत्र्यांना जेवण देत असे. बाकी तिला मात्र आवड.नव्हती.

तिचे आई-वडील आल्यावर त्यांचाशी भांडते व त्यांना मी शिकेन आणि मोठी होईन पण इतेच राहीन अशी सांगते असे. आईवडिलांच्या विरोधात जाऊन शिकेल पण दारू काढणार नाही आणि भिक ही मागणार नाही असं धाडस ठेवुन खुप मेहनत करीत दहावी पास केली. आईवडिलांन साठी आणि समाजातील मुलींना शिकता यावे यासाठी काहीतरी करायची जिद्द आहे. म्हणुन मला शिकायचं आहे आणि मोठं बनायचं आहे हेच तिचे ध्येय.

पुण्यात शिक्षणासाठी दाखल

रेणुकास पुढील शिक्षणासाठी मदत हवी आहे. यासाठी आपल्या मदतीची आम्हाला आवश्यकता आहे . जश्या जश्या मुली मोठ्या होत चालल्या तशी तशी जबाबदारी पण वाढत चालली. आणि हि जबाबदारी पेलायला आपण पाठीशी असणं तेवढेच खुप गरजेच आहे.