नागपूर: ‘चना पोहा विथ नितीनजी’ या कार्यक्रमात अभिनेत्री गिरिजा ओक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी स्वतःच्याही नागपूरसोबतच्या नात्याचा आणि आठवणींचा उलगडा केला. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर निळ्या साडीतील एका अभिनेत्रीचे छायाचित्र व्हायरल झाले आणि एका रात्रीत ती “नॅशनल क्रश” झाली. ही अभिनेत्री म्हणजे मराठमोळी गिरीजा ओक. नागपूरशी गिरीजाचा खास संबंध, कारण तिचं आजोळ नागपुरातील. म्हणूनच अजूनही तिचं नागपूरशी खास नातं आहे.

नागपूरची सांबरवडी म्हणजेच ज्याला आपण पुडाची वडी म्हणतो, ती गिरीजाच्या खास आवडीची. एका रात्रीत “नॅशनल क्रश” झालेल्या गिरीजाचे क्रश मात्र, नागपुरातील ही सांबारवडी म्हणजेच पुडाची वडी आहे. संधी मिळाली की ती तिच्या आजोळी येण्याची एकही संधी सोडत नाही. येथे तिचे मामा-मामी आणि भावंडे असतात. डॉ. गिरीश ओक आणि पदमजा फाटक यांची कन्या असली तरी गिरीजची एक स्वतंत्र ओळख आहे. सांबारवडी म्हणजेच पुडाची वडी सह तिला गोळाभात, तर्री पोहे या वस्तू देखील तीच्या आवडीच्या. गिरीजाची आई पद्मश्री फाटक नागपूरच्या आणि म्हणूनच गिरीजाचा जन्म नागपूरचा. गिरीजाचे शिक्षण मात्र बाहेर झाले. कामानिमित्त तिचे कुटुंबीय उरण, सांगली, मुंबईला फिरत राहिले. सुट्टीत मात्र ती तिच्या आजोळी नागपूरला येत असे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूरला आली असता ती खूप आजारी पडली. त्यामुळे दिवाळी किंवा इतर सुष्ट्यांमध्ये ती नागपूरला यायची. पुढे तिचे शालेय शिक्षण, नृत्य, गायन, अभिनय आदी शिक्षणाच्या धावपळीत नागपूरला येणे कमी झाले. मात्र बालपणी नागपूरला घालवलेले गंमतीदार दिवस तिच्या मनात कायम राहिले असून नागपूरशी तिचे भावनिक नाते आहे. अभिनय क्षेत्रात असूनही गिरीजा तिच्या मुलाला क्वालिटी टाईम देते. त्याच्या खाण्या-पिण्यापासून अभ्यासापर्यंत सान्याच गोष्टींकडे तिचे बारकाईने लक्ष असते. ती अत्यंत चविष्ट स्वयंपाक करते. मुलगा-संसार ही तिची पहिली पसंती आहे.

जाहिरातीतून अभिनयाला सुरवात…

अगदी लहान असताना एका जाहिरातीतून गिरीजाची पडद्यावरील कारकीर्य सुरू झाली. प‌द्मश्री फाटक मैत्रिणीच्या मुलाच्या ऑडिशनसाठी मैत्रिणीबरोबर एका स्टुडिओत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याबरोबर लहानगी गिरीजा होती. तिथा आत्मविश्वास, चुणचूणीतपणा पाहून तिची स्क्रिन टेस्ट घेण्यात आली. ध्यानीमनी नसताना गिरीजाची जाहीरातीसाठी निवड झाली. कॅमेऱ्याची जाण, अभिनय गिरीजात मुळात आहे. तिने तिच्या मेहनतीने त्यामध्ये कौशल्य मिळविले आहे.