वर्धा : साहित्य संमेलनात सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याच्या टीकेवर राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शासनाची भूमिका सावरणाऱ्या हातांची आहे, हस्तक्षेपाची नाही, असे ना. केसरकर यांनी स्पष्ट केले. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दीप प्रज्वलन करीत असताना मुख्यमंत्री शिंदे व त्यांनी हवेमुळे विझू पाहणाऱ्या ज्योतिस हाताचा आडोसा दिला. साहित्याची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे काम शासनाचे आहे.

हेही वाचा >>> नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दुसऱ्यांदा उच्च न्यायालयाची नोटीस

Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Calcutta High Court
संदेशखालीतील प्रकरण अत्यंत लाजिरवाणे; कलकत्ता उच्च न्यायालयाचे ताशेरे
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा

मुख्यमंत्र्यांनी स्वतःपूर्वी मावळते व विद्यमान संमेलनाध्यक्ष यांचा सत्कार झाल्यावरच स्वतः सत्कार स्वीकारला. त्यांना सन्मान देण्याचीच आमची भूमिका आहे. तोच संदर्भ देत ते म्हणाले की, शासनाची भूमिका स्पष्ट आहे. दोन कोटीचा निधी देण्यामागे मदतीची भावना आहे. साहित्यिकांनीच सर्व निर्णय घ्यावेत. बांधण्यात येत असलेले मराठी भाषा भवन हे सर्वोत्तम होईल. सर्व कार्यालये मुंबईतच राहतील. नव्या मुंबईत जे साहित्य भवन उभे होत आहे ते दोन वर्षात पूर्ण होईल. त्यात नाट्यगृह, निवास व्यवस्था व सर्व सोयी राहतील. वाचनाचे  महत्त्व जपावे लागेल. मराठी शाळा बंद होत आहे, त्यावर संमेलनात चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही केसरकर यांनी व्यक्त केली.