वर्धा : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत नुकतेच ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाच्या समारोपाचे पाहुणे असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यास उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांनी सकाळच्या सत्रात येणार असल्याचे कळविले होते. ते आलेही. मात्र, त्यांच्या आगमनापासून तर प्रस्थानापर्यंतच्या कालावधीत संमेलनस्थळी झालेल्या हालचाली चर्चेच्या विषय ठरल्या. उपमुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या, मग भाजप नेत्यांना आलेले भान आणि त्यानंतर मांडव भरला छान, हा गर्दीबाबत नेते किती सजग असतात, याचा चकित करणारा पुरावा ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळच्या सत्रात येणार असल्याचे कळविले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ उडाल्याने पोलीस यंत्रणा चांगलीच कामास लागली. फडणवीस यांच्या कार्यक्रमात काडीचाही आवाज होऊ नये म्हणून मग प्रवेशद्वारावरच कसून तपासणी सुरू झाली. संमेलनाध्यक्ष चपळगावकर यांनाही त्याचा फटका बसल्याने ते माघारी फिरले. त्यांचीच ही स्थिती तर रसिकांच्या संतापास पारावर उरला नव्हता. परिणामी मंडप ओस. ही स्थिती प्रवासातच असणाऱ्या फडणवीस यांच्या कानी पडली.

हेही वाचा – “आत्मदहन करू द्या, अथवा खुशाल गोळ्या घाला”, शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक, ११ फेब्रुवारीला आत्मदहनाचा निर्णय

हेही वाचा – मुंबई : तळीयेतील बाधित कुटुंबांसाठीच्या ६६ घरांचे काम मार्चमध्ये पूर्ण, २०० घरांच्या प्रकल्पाला अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाकडून वेग

समृद्धी वळण मार्गावर उतरताच त्यांनी स्वागत करण्यास आलेल्या खासदार रामदास तडस व अन्य भाजप नेत्यांना मंडपात गर्दी नसल्याची वित्तमबातमी दिली. नेते म्हणाले, साहित्यिक मंडळींचा कार्यक्रम असल्याने आम्ही हस्तक्षेप टाळला. त्यावर फडणवीस यांचा सवाल कानपिचक्याच ठरला. ते म्हणाले, मी येणार हे तुम्हास माहीत नव्हते का. क्षणात वारे फिरले. नंतर असलेला सावंगीचा कार्यक्रम आधी घेण्याची सूचना झाल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा सावंगीकडे वळला, तर भाजप नेत्यांनी मंडपाकडे धाव घेतली. फोनवरून संपर्क साधणे सुरू झाले. उपमुख्यमंत्री फडणवीस येणार, आपणास भेटणार, लवकर निघा, असे आदेश सुटले अन् सावंगीचा कार्यक्रम आटोपून फडणवीस समेलनस्थळाकडे येण्यास निघाले, तेव्हा उपस्थितीने बाळसे धरले होते. पोलिसांनाही कानमंत्र मिळाला. फडणवीस बोलायला उठले तेव्हा त्यांना ऐकायला बरेच ‘रसिक’ स्थानापन्न झाल्याचे दिसून आले. वेळेवर गर्दी कशी प्रकटली, त्याचे असे रहस्य एकाने लोकसत्ताशी ‘गोपनीय’ म्हणत उघड केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi sahitya sammelan wardha devendra fadnavis attendance and crowd pmd 64 ssb
First published on: 07-02-2023 at 11:51 IST