लोकसत्‍ता टीम

अमरावती: येथील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती दिनी राणा दाम्‍पत्‍याच्‍या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भीम ब्रिगेडच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या विरोधात खोटे गुन्‍हे दाखल केल्‍याबद्दल आंबेडकरी चळवळीतील संघटनांच्‍या वतीने राणा दाम्‍पत्‍याच्‍या निषेधार्थ मंगळवारी भरपावसात जिल्‍हा कचेरीवर मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते.

chhatrapati sambhajinagar, Chandrakant Khaire, Imtiaz Jaleel, Eid, lok sabha election 2024
औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागातही शिवसेनेचा राबता वाढला, खैरे आणि इम्तियाज जलील यांची गळाभेट
AAP's Latest Protest Against Arvind Kejriwal Arrest
केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ उपोषण
AAP workers attempt to enter Nitin Gadkaris campaign office in Nagpur
नागपुरात गडकरींच्या प्रचार कार्यालयात शिरण्याचा आप कार्यकर्त्यांचा प्रयत्न
meeting and entry in ncp party held at sharad pawar modi baug residence
पुण्यातील ‘मोदीबागे’त भेटीगाठी, बैठकांचा धडाका; राज्यातील विविध नेत्यांची शरद पवार यांच्याबरोबर चर्चा

येथील इर्विन चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. भर पावसात निघालेल्‍या या मोर्चात मोठ्या संख्‍येने आंबेडकरी चळवळीतील संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्‍यात आली. आक्रोश मोर्चाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसचे दिलीप एडतकर, हरिभाऊ मोहोड शिवसेनेच्‍या ठाकरे गटाचे सुनील खराटे, सुधीर सूर्यवंशी, वर्षा भोयर, पराग गुडधे, भीम ब्रिगेडचे अध्‍यक्ष राजेश वानखडे या आक्रोश मोर्चात सहभागी झाले.

हेही वाचा… “मुख्यमंत्री शिंदेंना जावं लागेल असं वाटत नाही, अजित पवारांचं जमण अशक्य”, आमदार बच्चू कडू यांचे भाकीत, म्हणाले..

खासदार नवनीत राणा यांनी निवडून आल्यापासून जिल्ह्यात एकही विकासाचे काम केले नाही. मात्र, आपल्या गळ्यात कधी भगवा दुपट्टा कधी निळा दुपट्टा कधी पिवळा दुपट्टा असा खोटारडेपणा करून संपूर्ण जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले असल्याचा आरोप वर्षा भोयर, पराग गुडधे, सुधीर सूर्यवंशी यांनी यावेळी केला. आता राणा दाम्‍पत्‍याने आपली नौटंकी थांबवली नाही, तर ज्याप्रमाणे मुंबईत शिवसैनिकांनी त्यांना आपल्या घरातून बाहेर पडू दिले नाही, तसेच अमरावती येथील शंकर नगर येथील घरातून त्यांना शिवसैनिक आणि भीमसैनिक मिळून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा यावेळी पराग गुडधे यांनी दिला.

हेही वाचा… अमरावती : अनैतिक संबंधांची वाच्यता होताच त्‍याने रचला हत्‍येचा कट अन् मग…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीदिनी राणा दाम्‍पत्‍य अभिवादन करण्‍यासाठी आले असताना भीम ब्रिगेडच्‍या कार्यकर्त्‍यांनी त्‍यांच्‍या विरोधात घोषणा दिल्‍या. पण, राणा दाम्‍पत्‍याच्‍या सांगण्‍यावरून भीम ब्रिगेडच्‍या पदाधिकाऱ्यांच्‍या विरोधात विनयभंगासारखा खोटा गुन्‍हा दाखल करण्‍यात आल्‍याचा मोर्चेकऱ्यांचा आरोप होता.