scorecardresearch

विवाहित तरुणाचा प्रेयसीवर बलात्कार

गेल्या दोन वर्षांपासून संकेत त्या तरुणीचे नागपुरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये नेऊन लैंगिक शोषण करीत होता

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : पत्नीला कँसर असून ती लवकरच मरणार आहे, असे सांगून अकोल्यातील विवाहित युवकाने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर त्याने प्रेयसीवर बलात्कार केला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संकेत सतीश जयस्वाल (२९, दुर्गानगर चौक, अकोला) असे आरोपी युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत जयस्वाल हा व्यापारी असून तो एका कंपनीशी जुळलेला आहे. पीडित उच्चशिक्षित असून सध्या बेरोजगार आहे. मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत पीडित २८ वर्षीय तरुणी आणि आरोपी संकेत या दोघांची भेट झाली. त्यानंतर एका कार्यक्रमानिमित्त ते मुंबईतही भेटले. आरोपी संकेतने तरुणीचा मोबाईल क्रमांक घेतला. दोघांची चॅटिंग सुरू झाली. ‘मी विवाहित असून मला एक मुलगी आहे. माझ्या पत्नीला कँसर असून ती लवकरच मरणार आहे.’ असे सांगून त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गेल्या दोन वर्षांपासून संकेत त्या तरुणीचे नागपुरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये नेऊन लैंगिक शोषण करीत होता. तिने लग्नाचा तगादा लावला असता पत्नीच्या मृत्यूनंतर करणार, असा बहाणा करून टाळाटाळ करीत होता. त्यामुळे तरुणीने अकोला गाठून त्याच्या पत्नीबाबत माहिती घेतली. तिला कँसर नसून संकेत आपल्याशी खोटे बोलला, असे तिच्या लक्षात आले. यानंतर तिने बेलतरोडी पोलीस ठाण्यात संकेतविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संकेत फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Married youth rapes girlfriend in nagpur zws