scorecardresearch

नागपूर: कॅन्सर रुग्णालयाचा चेंडू आता ‘एनएमआरडीए’च्या ‘कोर्टात’

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नागपुरातील कॅन्सर रुग्णालयाचे बांधकाम लवकरच करण्याची घोषणा विधिमंडळात केली.

NMRDA
नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या (एनएमआरडीए) (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नागपुरातील कॅन्सर रुग्णालयाचे बांधकाम लवकरच करण्याची घोषणा विधिमंडळात केली. त्यानुसार पहिल्या टप्यात २० कोटी रुपये नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या (एनएमआरडीए) खात्यात वळते होणार आहे.दरम्यान लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करा, अशी विनंती मेडिकल प्रशासनाने एन एमआरडीएला केले आहेनागपुरातील कॅन्सर रुग्णालयाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातरूग्णालय नागपुरात कसुरूक्षरण्याचे आश्वासन दिले गेले होते. प्रत्यक्षात काही झाले नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पातला गती देण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा >>>खळबळजनक! मठातील दोन जेष्ठ नागरिकांची निर्घृणपणे हत्या

त्यानंतर नुकतुच सभागृहात या प्रकल्पाचे लवकर बांधकाम करण्याची घोषणा झाली.शासनाकडून २० कोटींचा निधी या प्रकल्पाच्या बांधकामासाठी मंजूर झाला.तो ‘एनएमआरडीए’च्या वळता होणार आहे. त्यापूर्वी मेडिकल प्रशासनानेही या प्रकल्पात दिरंगाई होऊ नये म्हणून ‘एनएमआरडीए’ला पत्रासह अर्थसंकल्पात तरतूद झालेल्या २० कोटींच्या निधीचा अध्यादेश जोडून झटपट निविदा करण्याची विनंती केली आहे. यापूर्वीही एकदा ‘एनएमआरडीए’कडून या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली. परंतु, शासनाकडून निधी न मिळाल्याने शेवटी ‘एनएमआरडीए’कडून शासनाला ही संस्था करण्यास आम्ही समर्थ नसल्याचे कळवण्यात आले होते.नागपुरातील कॅन्सर रुग्णालयाबाबत शासन गंभीर असून लवकरच २० कोटींचा निधी ‘एनएमआरडीए’कडे वळता होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 13:09 IST

संबंधित बातम्या