नागपूर : सरकारी नोकरी आणि ती ही रेल्वेत म्हटल्यावर बेरोजगार युवकांना सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेने बेरोजगार युवकांसाठी विविध शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पूर्व रेल्वेत सुमारे ३१०० शिकाऊ पदांसाठी ही भरती होणार आहे.
भारतीय रेल्वे ही सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज २३१ लाख प्रवासी आणि ३३ लाख टन मालाची वाहतूक करते. भारतीय रेल्वे जगातील चौथी सर्वांत मोठी रेल्वेसेवा आहे. १२.२७ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारीसंख्येत जगातील आठवी सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे. रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग, भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्याचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.
हेही वाचा – हद्दच झाली! परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पेपरचे दहा प्रश्न रद्द
एवढा मोठ्या अवाढव्य रेल्वेचा पसारा पाहता त्यासाठी कुशल व अकुशल कामगारांची नियमित आवश्यकता असते. तांत्रिक ज्ञान असलेल्यांना विशेष मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन पूर्व रेल्वेने तीन हजारपेक्षा जास्त शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बुधवार, २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतीम तारीख २६ ऑक्टोबर आहे.
आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या पदभरतीचा लाभ मिळणार आहे. टर्नर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), इलेक्ट्रिशियन, पेंटर, सुतार, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, मेकॅनिक (डिझेल), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि मेकॅनिक (मोटर व्हेईकल) हा ट्रेड उमेदवार विविध पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराचे कमाल वय २४ वर्षांच्या दरम्यान असावे. मागासवर्गीयांना नियमानुसार वयोमर्यादेत सुट आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवार rrcer.com या वेबसाईटवरून अर्ज करू शकतात.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega recruitment for 3100 seats in railways job opportunity for unemployed pbr 75 ssb