वर्धा:  सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय उच्च शिक्षण संस्थेने उत्तम कामगिरी बजावत देशात पंचविसावा तर राज्यात पहिल्या तीन संस्थेत येण्याची भरारी घेतली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग द्वारा मान्यताप्राप्त नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फोरम या संस्थेतर्फे हे मानांकन दरवर्षी दिल्या जाते. मेघे संस्था सर्व राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेत 75 वी, विद्यापीठ श्रेणीत 39 वी असून या संस्थेचे दंत महाविद्यालय देशातील दंत महाविद्यालयत सतरावे आले आहे.

संस्थेने संशोधन,रुग्ण सेवा, सामुदायिक सेवा, विविध वैद्यकीय उपक्रम , कारोना कालीन उपचार व अन्य विभागात अव्वल कामगिरी नोंदविल्याचे प्रशासकीय अधिकारी डॉ.उदय मेघे यांनी सांगितले.गतवर्षी राज्यात आमची संस्था पहिल्या तीन मध्ये तर यावर्षी दुसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.विश्वस्त सागर मेघे, प्रबंध संचालक डॉ.राजीव बोरले, कुलगुरू डॉ.ललित वाघमारे,सल्लागार डॉ.मिश्रा यांचे योगदान व कुलपती दत्ता मेघे यांचे मार्गदर्शन संस्थेचा लौकिक वाढविण्यास कारण ठरल्याचे ते सांगतात. काही वर्षांपूर्वी संस्थेने सुरू केलेल्या सिद्धार्थ गुप्ता कर्करोग संशोधन व उपचार केंद्राने या वाटचालीत महत्वाचा वाटा उचलल्याचे म्हटल्या जाते.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?