भंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द ; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब | Membership of four directors of Bhandara Urban Bank cancelled amy 95 | Loksatta

भंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द ; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांनी १९ मार्च २०२१ रोजी सर्व चारही संचालकांना अपात्र घोषित केले होते.

भंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द ; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
भंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द

विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशाला सहकार मंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या दि. भंडारा अर्बन बँकेचे संचालक हिरालाल बांगडकर यांनी कायदेशीर लढा जिंकला आहे. विभागीय सहनिबंधकांचा आदेश कायम ठेवत भंडारा अर्बन बँकेचे चार सदस्य अपात्र घोषित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या चारही संचालकांना पुढील सहा वर्ष कुठलीही निवडणूक लढण्यास बंदी घातली गेली आहे.

हेही वाचा >>> वर्धा : गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ दोन दिवसांत पुन्हा झळकणार मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर

जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या दि. भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष जयंत वैरागडे, संचालक रामदास शहारे, ज्योती बावनकर आणि दिनेश गिरेपुंजे यांच्या विरोधात बँकेचे संचालक हिरालाल बांगडकर यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांच्याकडे तक्रार करून चारही संचालकांची सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. बँकेच्या उपविधीत मंजूर तरतुदीप्रमाणे कर्तव्य पार न पाडल्याचा आरोप बांगडकर यांनी चारही संचालकांवर केला होता.

हेही वाचा >>> नागपूर: शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचा प्रकार! ; जिल्हा प्रशासनाकडून उपेक्षा

सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांनी १९ मार्च २०२१ रोजी सर्व चारही संचालकांना अपात्र घोषित केले होते. या निर्णयाला सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती. दरम्यान, या स्थगितीच्या विरोधात बांगडकर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेले. त्या ठिकाणी दाखल याचिकेवर न्यायालयाने निर्णय देत स्थगिती हटवून विभागीय सहनिबंधकांनी दिलेले आदेश कायम ठेवण्याचा निर्णय दिला. बँकेच्या उपविधीतील तरतुदीचे पालन न केल्याचा ठपका न्यायालयाने चार संचालकांवर ठेवला आहे. संचालकांना पुढील सहा वर्ष सहकारातील कुठलीही निवडणूक लढवण्यास बंदी घातली असल्याचे बांगडकर यांनी सांगितले.अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. लवकरच बँकेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. अशावेळी चार महत्त्वाच्या संचालकांसंदर्भात आलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
वर्धा : गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ दोन दिवसांत पुन्हा झळकणार मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर

संबंधित बातम्या

५२८ विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
नागपुरात RSS मुख्यालयात मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण, ‘भारत माता की जय’चा जयघोष
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र लवकरच शालेय अभ्यासक्रमात – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
यंदा २६ हजार नागरिकांकडून धम्मदीक्षा; गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दीक्षाभूमीवरील सोहळय़ाला मोठा प्रतिसाद
बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांवर अन्याय; वसतिगृहांत प्रवेश नाकारल्याने नाराजी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती; निती आयोगाच्या धर्तीवरील संस्थेत ठाण्याचे विकासक अजय आशर
डिसेंबर सर्वाधिक थंडीचा महिना; राज्यभर किमान तापमान सरासरीखाली
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण
जत तालुक्याला पाणी योजनांसाठी निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सरकारतर्फे वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल ; पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी