जयताळा परिसरात असलेल्या मूकबधिर मुला-मुलींच्या शाळेतील कर्मचाऱ्याने एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. हे प्रकरण उघडकीस येताच पालकांनी शाळेत धाव घेतली. शाळेत मोठा तणाव निर्माण झाला. पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले.

हेही वाचा >>>सात महिन्यांत ‘एमपीएससी’चा अभ्यास कसा करणार?

7 year old boy drowned in swimming pool marathi news
पुणे: जलतरण तलावात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वारजे भागातील दुर्घटना
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक
Kidnapping of a minor girl by giving lure of chocolate
चॉकलेटचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण, दारुड्या युवकाने…

पोलीस निरीक्षक नरके यांच्या दिलेल्या माहितीनुसार, मुलगी ही मूकबधिर शाळेची विद्यार्थिनी आहे. त्या शाळेतील एक कर्मचारी तिच्याशी काही दिवसांपासून अश्लील चाळे करीत होता. ८ डिसेंबर सायंकाळी सात वाजता त्या कर्मचाऱ्याने मुलीशी अश्लील चाळे करीत त्रस्त केले. त्यामुळे मुलीने घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला. शिक्षकांनी शहानिशा केली आणि तिच्या पालकांना माहिती दिली. सोमवारी पालकवर्ग शाळेत जमा झाले. त्यांनी त्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.