बुलढाणा : चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील घटनेचे पडसाद आज चिखली नगरीत उमटले. सकल हिंदू समाज व शिवप्रेमींनी आज मंगळवारी उत्स्फूर्त बंद पाळला. सध्या चिखलीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून वरिष्ठ अधिकारी नगरीत तळ ठोकून आहे. चिखलीसह मेरा खुर्द गावात तणावपूर्ण शांतता आहे.

सोमवारी २० फेब्रुवारीला रात्री उशिरा मेरा खुर्दमध्ये घडलेल्या घडामोडीच्या निषेधार्थ आज चिखलीत सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध संघटना, सकल हिंदू समाजतर्फे बंदचे आवाहन करण्यात आले. याला शिवप्रेमी नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बंदमुळे शहरात दररोज होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली. तसेच दैनंदिन व्यवहार प्रभावित झाले.

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या
Married woman murder Hatkanangale
हातकणंगलेत विवाहितेचा गळा आवळून खून

हेही वाचा >>> “संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यांच्या मेंदूचा केमिकल…”, बच्चू कडूंची ‘त्या’ आरोपांवरून टीका!

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्यासह अतिरिक्त पोलीस चिखलीत दाखल झाले. सध्या अधिकारी तिथे तळ ठोकून असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शहरासह मेरा खुर्द गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे सूत्रांनी सांगितले. महामुनी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले.

हेही वाचा >>> “शिवसेना संपवल्याचा अमित शहांना आसुरी आनंद” प्रकाश आंबेडकरांचा घणाघात म्हणाले, “आमच्या नादी लागाल तर…”

काय आहे प्रकरण?

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मेरा खुर्द (ता. चिखली) येथील काही युवकांनी काल सोमवारी रात्री समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. तिथे उपस्थित जमावाने रात्री मेरा चौकी येथील काही दुकानांची तोडफोड केली. दरम्यान, अंढेरा पोलिसांनी सलमान शेख सलीम, शेख सोहेल शेख रफिक, तौसिफ शहा बशीर शहा, तोहित शहा इब्राहीम शहा, अनिस शहा सांडू शहा या युवकांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.