निसर्गाशी नाते सांगणाऱ्या रंगाच्या संगतीने खादी कापडावर केलेली कलाकारी चित्रकलेचा नवाच आविष्कार ठरली. मगन संग्रहालयातील विशाल वटवृक्षाच्या छायेत ही रंगकारी कला आकारास आली. खादीची आवड वाढावी व नैसर्गिक रंगाचा प्रसार व्हावा म्हणून या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा >>>नागपूर: क्रिकेट सट्टेबाजीने घेतला व्यापाऱ्याचा बळी, आत्महत्येपूर्वी…

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

चित्र रेखाटतांना पळस फुल, कथ्या,डाळिंबाची साल, बेहडा,निळ्, हरडा, हळद व अन्य वनस्पतींपासून तयार करण्यात आलेले रंग वापरण्यात आले होते. सिद्धहस्त चित्रकारांसोबतच बाल कलाकारांनीही कुंचला चालविला.

डॉ. विभा गुप्ता यांच्या संकल्पनेतून मगन खादी तयार होत आहे. विदेशी पर्यटक ही सेंद्रिय रंगांपासून तयार खादी आवर्जून विकत घेतात. सेंद्रीय शेती ते सेंद्रिय वस्त्रे असा हा प्रवास असल्याचे विभागप्रमुख मुकेश लुतडे म्हणाले. भारतात प्रथमच या स्वरूपात कापड तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.