नागपूर : नीरजा समूहातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आले. पर्यावरणावर आधारित या कविसंमेलनात कवींनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश दिला.

कविसंमेलनाच्या सुरुवातीलाच संमेलनाध्यक्ष व चंद्रपूर येथील कवी नरेश बोरीकर यांनी वृक्षलागवड करून त्याचे संगोपन आवश्यक असल्याचा संदेश दिला. प्राणवायूशिवाय कु णीही जिवंत राहू शकत नाही आणि वृक्षापासून प्राणवायू मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवली पाहिजे व पर्यावरणाचे संतुलन साधले पाहिजे, असे आवाहन के ले. नीरजा समूह प्रशासक आनंदवन येथील नरेंद्र कन्नाके  यांनी प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड लावलेच पाहिजे, असा सकारात्मक संदेश देणारी ‘एक झाड लावू’ ही कविता सादर के ली. राज्यातील प्रसिद्ध कवींची निवड करून आयोजित केलेल्या या ऑनलाईन कविसंमेलनात प्रत्येक कवींनी पर्यावरणावर आधारित प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. यात प्रामुख्याने मुंबई येथील दुर्गा देशपांडे यांनी ‘निसर्ग कोपतो तेव्हा’, पुण्यातील सावित्री कांबळे यांनी ‘पर्यावरण वाचवा’, औरंगाबाद येथील भारती सोळंके  यांनी ‘झाडेझुडे’, चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर यांनी ‘श्वास पुन्हा घेण्यासाठी’, यवतमाळच्या सोनल गादेवार यांनी ‘पर्यावरणाचे जतन’, बीडच्या सुरेखा इंगळे यांनी ‘पिंपळपान’, जळगावचे एन.आर. पाटील यांनी ‘निसर्गाशी करू मैत्री’, बल्लापूरच्या अर्जुमनबानो शेख यांनी ‘संतुलित राखण्या पर्यावरण’, नागपूरच्या अंजली देशपांडे यांनी ‘सरीवर सरी’, गुजरातमधील वडोदराच्या रेखा तांबे यांनी ‘ऋण वसुंधरेचे’, वध्र्याच्या पूनम बुरीले यांनी ‘करोना’, बुलढाण्याचे नितीन निमकर्डे यांनी ‘शाळा’, भद्रावतीचे प्रकाश पिंपळकर यांनी ‘प्राणवायू’, नंदिनी कन्नाके  यांनी ‘स्त्री जन्माची कहाणी’ या कविता सादर के ल्या.