नागपूर : भारतीय हवामान खात्याने राज्याच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील असे भाकित केले होते, पण हवामान खात्याने त्याचे रंग बदलले. येत्या रविवारपर्यंत पावसाच्या सरी नाही तर उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीपासून नागपुरातील काँग्रेस नेत्यांना का दूर ठेवले ?

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….

हवामानखात्याने आता विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. या तीन दिवसांत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेही मुंबई, कोकण पट्ट्यांमध्ये हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे उकाडादेखील वाढला आहे. मात्र, दुपारी दोनपर्यंत उष्णतेच्या झळा असल्या तरीही त्यानंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनचा प्रवास आता वेगाने पुढे पुढे जात आहे. आतापर्यंत तो बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरात ताटकळत होता.