Premium

नागपूर : हवामानाने बदलले रंग, मान्सूनपूर्व पावसाच्या सरी नाही, तर…..

हवामानखात्याने आता विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे.

heat wave in Vidarbha
नागपूर : हवामानाने बदलले रंग, मान्सूनपूर्व पावसाच्या सरी नाही, तर….. (image – pixabay)

नागपूर : भारतीय हवामान खात्याने राज्याच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील असे भाकित केले होते, पण हवामान खात्याने त्याचे रंग बदलले. येत्या रविवारपर्यंत पावसाच्या सरी नाही तर उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीपासून नागपुरातील काँग्रेस नेत्यांना का दूर ठेवले ?

हवामानखात्याने आता विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. या तीन दिवसांत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेही मुंबई, कोकण पट्ट्यांमध्ये हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे उकाडादेखील वाढला आहे. मात्र, दुपारी दोनपर्यंत उष्णतेच्या झळा असल्या तरीही त्यानंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनचा प्रवास आता वेगाने पुढे पुढे जात आहे. आतापर्यंत तो बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरात ताटकळत होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 16:26 IST
Next Story
लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीपासून नागपुरातील काँग्रेस नेत्यांना का दूर ठेवले ?