भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टी२० सामना शुक्रवारी नागपुरात पार पडला. सामन्याच्या दिवशी मेट्रोने ८०,७९४ प्रवासी वाहतूक केली.
१५ ऑगस्ट २०२२ला एकाच दिवशी ९०,७५८ प्रवाशांनी मेट्रो ने प्रवास केला होतासंख्या नोंद केल्या नंतर महा मेट्रोने परत एकदा मोठ्या संख्ये व तो उच्चांक होता. शुक्रवारी तो मोडला गेला.

हेही वाचा >>>…अन् क्रिक्रेट स्टेडिअममध्ये अनाथ मुले झाली ‘व्हीआयपी’- नागपूरच्या पोलीस आयुक्तांची अशीही उदारता

क्रिकेट सामन्यासाठी महामेट्रोने चिंचभवन मधील न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन येथून स्टेडियम पर्यंत जाण्याकरिताआणि परत येण्यासाठीबस गाड्यांची विशेष सोय केली होती. रात्री सामना संपल्यावर १ वाजे पर्यंत मेट्रोसुरु राहणार होती. पण सामना संपल्यावर परत येणाऱ्या क्रिकेट प्रेमींचा ओघ बघता सेवा ३ वाजे पर्यंत महा मेट्रोने सुरु ठेवली होती. नागपूरकर आणि क्रिकेट प्रेमींच्या सोइ करता महा मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> भंडारा : वगार खाऊन वाघाची वडस्याकडे कुच – पाऊलखुणा कॅमेऱ्यात कैद

रात्री उशिरपर्यंत मिळाली हि प्रवासी सेवा महिला प्रवाश्यांकरता वरदान असल्याचे वैशाली गुप्ता या महिला क्रिकेट फॅन ने म्हटले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सामना संपल्यावर मेट्रोने ३ वाजे पर्यंत दिलेली सोय महिलांसाठीअतिशय उपयुक्त ठरल्याचे ती म्हणाली.