नागपूर: क्रिकेट सामना मेट्रोला पावला ; एका दिवसाची प्रवाशी संख्या ८१ हजार ,सामना संपल्यावर रात्री ३ पर्यंत सेवा | Metro carried 80 794 passengers during the India vs Australia match amy 95 | Loksatta

नागपूर: क्रिकेट सामना मेट्रोला पावला ; एका दिवसाची प्रवाशी संख्या ८१ हजार ,सामना संपल्यावर रात्री ३ पर्यंत सेवा

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टी२० सामना शुक्रवारी नागपुरात पार पडला. सामन्याच्या दिवशी मेट्रोने ८०,७९४ प्रवासी वाहतूक केली.

नागपूर: क्रिकेट सामना मेट्रोला पावला ; एका दिवसाची प्रवाशी संख्या ८१ हजार ,सामना संपल्यावर रात्री ३ पर्यंत सेवा
क्रिकेट सामन्यासाठी महामेट्रोने चिंचभवन मधील न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन येथून स्टेडियम पर्यंत जाण्याकरिताआणि परत येण्यासाठीबस गाड्यांची विशेष सोय केली होती

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टी२० सामना शुक्रवारी नागपुरात पार पडला. सामन्याच्या दिवशी मेट्रोने ८०,७९४ प्रवासी वाहतूक केली.
१५ ऑगस्ट २०२२ला एकाच दिवशी ९०,७५८ प्रवाशांनी मेट्रो ने प्रवास केला होतासंख्या नोंद केल्या नंतर महा मेट्रोने परत एकदा मोठ्या संख्ये व तो उच्चांक होता. शुक्रवारी तो मोडला गेला.

हेही वाचा >>>…अन् क्रिक्रेट स्टेडिअममध्ये अनाथ मुले झाली ‘व्हीआयपी’- नागपूरच्या पोलीस आयुक्तांची अशीही उदारता

क्रिकेट सामन्यासाठी महामेट्रोने चिंचभवन मधील न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन येथून स्टेडियम पर्यंत जाण्याकरिताआणि परत येण्यासाठीबस गाड्यांची विशेष सोय केली होती. रात्री सामना संपल्यावर १ वाजे पर्यंत मेट्रोसुरु राहणार होती. पण सामना संपल्यावर परत येणाऱ्या क्रिकेट प्रेमींचा ओघ बघता सेवा ३ वाजे पर्यंत महा मेट्रोने सुरु ठेवली होती. नागपूरकर आणि क्रिकेट प्रेमींच्या सोइ करता महा मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> भंडारा : वगार खाऊन वाघाची वडस्याकडे कुच – पाऊलखुणा कॅमेऱ्यात कैद

रात्री उशिरपर्यंत मिळाली हि प्रवासी सेवा महिला प्रवाश्यांकरता वरदान असल्याचे वैशाली गुप्ता या महिला क्रिकेट फॅन ने म्हटले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सामना संपल्यावर मेट्रोने ३ वाजे पर्यंत दिलेली सोय महिलांसाठीअतिशय उपयुक्त ठरल्याचे ती म्हणाली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
…अन् क्रिक्रेट स्टेडिअममध्ये अनाथ मुले झाली ‘व्हीआयपी’- नागपूरच्या पोलीस आयुक्तांची अशीही उदारता

संबंधित बातम्या

बाबा स्वत:ची काळजी घ्या, मला माफ करा; स्पर्धा परीक्षेतील अपयशाने खचून विद्यार्थ्याची आत्महत्या
नागपूर : गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड
‘मनरेगा’ आयुक्तालयातच ५२ टक्के पदे रिक्त
रोमहर्षक हवाई कसरतींनी नागपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
यवतमाळ : रस्ता देता का रस्ता?, चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्याचे शेतात उपोषण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द